रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पिस्टल व जिवंत राऊंड हस्तगत करुन केले जेरबंद..

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे ग्रामीण हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव रामभाऊ तावरे व त्याचा साथीदार आदित्य प्रकाश वाटविसावे हे दोघे कोथरुड पोलीस ठाणे हद्दीमधील आशिर्वाद मेसचे बाजुचे पुणे- बेंगलोर हायवेकडे वारजेच्या दिशेने जाणा-या सर्व्हिस रोड येथे येणार असुन त्यांनी त्यांचे जवळ विनापरवाना पिस्टल व राऊंड आहेत, अशी माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार चौधर व दहिभाते यांना गोपनीय बातमीदारांमार्फत खबर मिळाली होती.

मिळालेली बातमी तात्काळ वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशानुसार तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन वैभव रामभाऊ तावरे, वय २३ वर्षे व आदित्य प्रकाश वाटविसावे, वय २३ वर्षे या गुन्हेगारांना ताब्यात घेतले व त्यांची अंगझडती घेत असतांना आरोपी वैभव रामभाऊ तावरे याचे ताब्यातुन ३०,००० /- रु. किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व आरोपी आदित्य वाटविसावे याचे ताब्यातुन ०२ जिवंत राऊंड मिळून आले आहे.

पिस्टल व राऊंड हे आरोपींनी विनापरवाना व अनाधिकृतपणे कब्जात बाळगल्यामुळे त्यांचेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर सध्यस्थितीत गुन्ह्याचा तपास पो.हवा. चौधर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परि-३ पुणे शहर श्री. सुहेल शर्मा, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग पुणे श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर श्री. हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्ह) बाळासाहेब बडे, पोउपनिरी बसवराज माळी, पोलीस अंमलदार चौधर, चौगुले, दहीभाते, राऊत, सूळ, शिर्के, वाल्मिकी यांनी केली आहे

Exit mobile version