रिपब्लिकन सेनेच्या वतीने विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने लढवविणार – आनंदराज आंबेडकर

मुंबई, निर्भीड वर्तमान:- दिनांक ३० जून २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर मुंबई येथील रिपब्लिकन सेनेच्या केंद्रीय कार्यालयात रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येणारी विधानसभा निवडणूक आणि संघटन बांधणी या विषयावर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत राज्य कार्यकारिणी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत, अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून एकमताने खालील निर्णय घेण्यात आले.

1) त्यामध्ये रिपब्लिकन सेना आणि मित्रपक्ष यांच्यावतीने लढवलेली अमरावती लोकसभा निवडणूक यातून बोध घेऊन झालेल्या चुकांचे आत्मचिंतन करून येणारी विधानसभा निवडणूक रिपब्लिकन सेनेच्या वतीने पूर्ण ताकतीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

2) तसेच विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी करण्याचे सर्व अधिकार रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

3) त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रिपब्लिकन सेना कार्यकारणी मजबूत करणे त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांसाठी निरीक्षक नेमण्यात आले.

4) तसेच महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्याकारीण्या बरखास्त करून मा. विनोद काळे [मुंबई], चंद्रकांत खंडाईत [ सोलापुर ], मा. मिलिंद बनसोडे [छ. संभाजीनगर], मा. चंद्रकांत रुपेकर [छ. संभाजीनगर] यांची राज्यकार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी श्री. भगवान दादा शेंडे यांची महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

या महत्वपूर्ण बैठकीला नेते आनंदराज आंबेडकर साहेब यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, सरचिटणीस प्रा. युवराज धसवाडीकर, पक्ष प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे, प्रा. विजयकुमार लामकानेकर, उपाध्यक्ष खाजामियां पटेल, कोषाध्यक्ष भगवान दादा शेंडे, संघटक भय्यासाहेब भालेराव, सचिव श्रीपतराव ढोले, संजय देखणे, सिध्दार्थ कांबळे, चौरे योगेंद्र, शशिकांत कांबळे उपस्थित होते. रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या दिनांक 30 जून 2024 रोजी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा निरीक्षक निवडण्यात आले आहेत.

1.जिल्हा ठाणे – जिल्हा निरीक्षक मा. काकासाहेव खंबाळकर

2. नांदेड, परभणी – प्रा. युवराज धसवाडीकर

3. छ. संभाजीनगर, जालना – मा. भैय्यासाहेब भालेराव

4. मुंबई – मा. विनोद काळे

5. पालघर – मा. वसंत कांबळे

6. जळगाव, धुळे, नंदुरबार – प्रा. विजयकुमार लामकानेकर

7. लातूर, धाराशिव, पुणे – मा. खाजामिया पटेल

8. कोल्हापूर, सातारा – मा. संजय देखणे

9. बीड, हिंगोली, वाशीम – मा.श्रीपती ढोले

10. अकोला, अमरावती – मा. भगवान शेंडे

11. यवतमाळ, बुलढाणा, वर्धा – मा. योगेंद्र चौरे

12. सांगली सोलापूर – मा. चंद्रकांत खंडाईत

13. अहमदनगर, नाशिक – मा. शशीकांत कांबळे

Exit mobile version