आर.पी.आय.(A) सातारा जिल्हाउपाध्यक्ष यांनी आनेवाडी टोल नाका व कराड शहर टोल नाकाबंद करण्याची केली मागणी..!!

वर्तमान टाइम्स। वृत्तसेवा :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.संतोष बाळासाहेब नलावडे यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्याकड़े निवेदन देऊन विनंती सह इशारा सरकार दरबारी पाठविला आहे निवेदना मध्ये म्हटले आहे की टोल नाकाच्या मुदत संपून वर्ष झाले असून नॅशनल हायवे ऑथोरिटी करून त्यांना नेहमीच मुदतवाढ देऊन सातारा जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या माथ्यावर टोलनाक्याचे भूत मारले जात आहे, त्यामुळे टोल चालक व तेथील कर्मचारी यांचे मुजोरीही वाढली आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रोज मारहाण होत आहे.

आणेवाडी टोल नाका व तासावडी टोलनाका येथे गुंड प्रवृत्तीचे लोक उभे करून प्रवासी वाहनचालक यांच्यावर अत्याचार करत आहेत कालच तासवडे टोलनाक्यावरील प्रवाशाला बेदम मारहाण करण्यात आली त्याचा सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तर टोल नाका प्रशासनाने सुरू ठेवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या दोन थोबाडीत मारण्याच्या शासकीय परवाने द्यावे आणि वाहनाचा टोल ही आकारण्यात यावा सातारा जिल्ह्यात तोंडावर होणाऱ्या मारहाणी हे दुर्दैवी आहे सदर बाब गंभीर आहे जिल्ह्याच्या बदनामीचे काम टोल नाका चालकाकडून होत आहे पुणे जिल्हा मध्ये जसे पिंपरी चिंचवड एम एच 14 पुणे शहर एम एच १२ मोफत वाहतूक केली जाते तर त्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील एम एच 50 व एम एच 11 यांना मोफत केला गेला नाही तर येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हजारो कार्यकर्ते टोलनाका बंद करतील असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version