राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हारून खान यांचा असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

ठाणे दि. 23 ( निर्भीड वर्तमान ):- मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुन खान यांनी ठाणे शहरातील किसन नगर २ येथील #शिवसेना शाखेत उपस्थित राहून त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

हारून खान यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लीम नगरसेवक शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या ५० नगरसेवकांच्या वर गेली आहे.

मुंबई महानगरपालिकेत आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत. मुख्यमंत्री स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत आहे. पावसाळ्यात स्वतः नालेसफाईची पाहणी केल्याने यंदा रस्त्यावर पाणी साचल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

तुमच्या परिसरातील रुग्णालय असो किंवा रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीने सर्व यंत्रणा एकत्र आणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

#Shivsena #Mumbai #EknathShinde

Shivsena – शिवसेना Naresh Mhaske

Exit mobile version