विप्रोचे संस्थापक व ज्येष्ठ उद्योगपती अझिम प्रेमजी यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते प्रदान..!!

वर्तमान टाइम्स वृत्तसेवा :- अझिम प्रेमजी यांनी औद्योगिक क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे आहेच यासह विविध सामाजिक उपक्रमांना ते करीत असणारे सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या या एकंदर कार्याचा गौरव ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या वतीने विप्रोचे चीफ एन्डोन्मेंट ऑफिसर के. आर. लक्ष्मीनारायणन यांनी स्वीकारला. यावेळी मा.अझिम प्रेमजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना चव्हाण साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते पुर्ण करण्याचा प्रांजळ प्रयत्न चव्हाण सेंटर करीत आहे. सेंटरच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात, या वर्षीपासून ‘मेंटल हेल्थ हेल्पलाईन’ सुरु करण्यात येत आहे. परिसर आशा या संस्थेच्या मदतीने आणि कॅप जेमिनी कंपनीच्या सहकार्याने वर्षभर ही हेल्पलाईन चालविण्यात येणार आहे.

डिजिटल श्रवणयंत्र वाटपात जागतिक विक्रम चव्हाण सेंटरने केला आहे. गिनिज बुक मध्ये त्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती. या वर्षीपासून श्रवणयंत्र वाटपात आता लोकसहभागाचा ‘गिफ्ट अ हेअरिंग एड’ हा उपक्रम राबवणार आहेत.

तर तिसरा उपक्रम म्हणजे ‘यशवंत संवाद’ या नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. त्यात चव्हाण सेंटरच्या सर्व उपक्रमांची माहिती मिळणार आहे.


या वर्षी आदिवासी विकासाचा उपक्रम चव्हाण सेंटर राबवणार आहे.आदरणीय पवार साहेबांची हा उपक्रम राबवावा अशी इच्छा होती.त्यानुसार प्रतिभा शिंदे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

तसेच शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत साहित्य विभागात पहिल्या वर्षी विज्ञान या प्रकारासाठी निवड झालेल्या असीम अमोल चाफळकर या फेलोने लिहिलेले आधुनिक जीवशास्त्राची साधने जनुककोशशास्त्र हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. मराठीतील हे या विषयावरील पहिले पुस्तक आहे.
भारत चीन युद्धावेळी चव्हाण साहेबांची भूमिका, त्यांचे आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांचे संबंध, त्यांचे परराष्ट्र धोरण या विषयावर फेलोशिप दिली जाणार आहे. उद्याच्या पिढीला चव्हाण साहेब कोण होते, याची माहिती होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विविध भाषेतील वेबसाईट सुद्धा सुरु केली आहे.

याप्रसंगी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर,उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कोषाध्यक्ष हेमंत टकले, अजित निंबाळकर, बाळकृष्ण आगरवाल, विवेक सावंत, अनिल देशमुख,दिलीप वळसे पाटील, डाॅ. समीर दलवाई, दीप्ती नाखले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य, निवड समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version