मोक्याच्या गुन्हयातील दीड वर्षापासून पसार झालेल्या आरोपीस वारजे माळवाडी पोलीसांनी ठोकल्या बेडया..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक, नरेंद्र मुंढे, पोउपनि पार्वे व पोलीस अंमलदार यांचेकडुन वारजे माळवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. १९१/२०२१, भा.द.वि. कलम ३०७,३८७, १२० (ब), ३४ क्रि. लॉ. अ. अॅक्ट कलम ७ आर्म अॅक्ट कलम ४ (२५), म.पो.अधि. कलम ३७ (१) (३)१३५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि.क. ३ (१) (ii ), ३(२), ३ ( ४ ) या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नकुल शाम खाडे याचेशी संबंधीत नातेवाईक तसेच मित्रांच्या हालचालींवर सुमारे तीन महिन्यापासून पाळत ठेवुन होते.

तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नकुल खाडे हा त्याचे पत्नीस अधून-मधून भेटण्यास येवून जात आहे. व आरोपी नकुल हा त्याचे पत्नीला भेटण्याकरीता चांदणी चौक या ठिकाणी थांबणार आहे. या बाबतची खात्री करण्यासाठी तपास पथकाचे अंमलदार यांचेसह बातमीच्या ठिकाणी जावून थांबले असताना, काही वेळातच आरोपी नकुल हा चांदणी चौक या ठिकाणी येताच त्याला पाहुन त्यास थांबण्याचा इशारा केला असता, तो तेथे न थांबता पळून जावू लागल्याने, त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले. त्यानंतर नकुल यास ताब्यात घेवुन वारजे माळवाडी पो स्टे येथे आणुन त्याच्याकडे चौकशी करता त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे, श्रीमती रुक्मीणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. दत्ताराम बागवे, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, नरेंद्र मुंढे, पार्वे, पोलीस अंमलदार, रामदास गोणते, प्रदीप शेलार, अमोल राऊत, गोविंद फड, हनमंत मासाळ, बंटी मोरे, विजय भुरूक, नितीन कातुर्डे, अजय कामठे, श्रीकात भांगरे, गोविंद कपाटे यांनी केली आहे.

Exit mobile version