मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व जाती-धर्मीयांना उमेदवारी देऊन रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा पुसणार- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, निर्भीड वर्तमानः- लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने महायुतीचा प्रामाणिक प्रचार केला मुंबईत महायुतीच्या उमेदवारंना रिपब्लिकन पक्षाने प्रामाणिक पणे साथ दिली आहे. प्रचंड मेहनत करुन महायुतीच्या उमेदवाचा प्रचार केला आहे. महायुतीच्या एकजुटीमुळे मुंबईत सर्व 6 जागांवर महायुतीचा विजय होईल हे निश्चित आहे. महायुतीच्या होणाऱया विजयात रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

अंधेरी येथे कर्मविर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष राज्यात 10 जागांची मागणी करणार असुन त्यापैकी मुंबईत विधानसभेच्या 2 जागा रिपब्लिकन पक्ष लढविणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत रिपब्लिकन पक्ष 20 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. महापालिका निवडणुकीत दलितान सोबत मुस्लिम, मराठा, गुजराती भाषीक उत्तर भारतीय अशा विविध जाती धर्माच्या उमेदवारंना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देऊन रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करणार आहोत. बौध्द, मातंग, दलितांमधील जाती,ओबीसी आणि मुस्लिमां सह जातीची समिकरणे जुळवून मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे ना.रामदास आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पक्षात मातंग आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, मराठा आघाडी, गुजराती भाषीक आघाडी अशा विविध आघाड्या असल्या तर अन्य पक्ष रिपब्लिकन पक्षाला का जातीचा पक्ष मानतात. रिपब्लिकन पक्षाची ही एकजातीय प्रतिमा पुसण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहान ना.रामदास आठवले यांनी केले. लोकसभा निवडणुकीत ज्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरुध्द काम केले पक्षात शिस्त भंग केला त्या कार्यकर्त्यांना पक्षातुन निलंबित करावे असे आदेश ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिले आहेत.

यावेळी सौ.सिमाताई आठवले, राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,महिला आघाडीच्या उषाताई रामलु,अॅड.अभया सोनवणे,वंदना मेहता,विवेक पवार,सुरेश बारसिंग,एम.एस.नंदा,राय बहादुर,घनश्याम चिरणकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमळाकर जाधव,अजित रणदिवे,संजय डोळसे,रमेश गायकवाड,साधु कटके तसेच चंद्रकांत पाटील,सुनिल बन्सी मोरे,युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते, जयंतीभाई गडा, राशिद अन्सारी, रेश्मा खान , रत्ना ताई शिंदे ,सुनील पवार, रमेश पाईकराव, राजाभाऊ गांगुर्डे, सुनील गमरे,विजय वाघमारे, संजय खंडागले, रवी गायकवाड, श्रीमंत तोरणे, विजय वंजारी, अनिस पठाण, दादू भोसले, रतन अस्वारे, योगेश शिळवंत आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version