मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीस चोवीस तासांच्या आत रावेत पोलीसांनी केले जेरबंद..!!

पुनावळे येथे सापळा रचुन केली अटक..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- राजेश शिवलिंग जाधव वय ३८ याचा खुन झाल्याबाबत तेथील जागा मालक विकास प्रकाश जाधव यांनी फिर्याद दिल्यावरुन रावेत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०९/२०२३ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत झालेले घटनास्थळी मोबाईल मिळुन आला नाही. तसेच मयत व्यक्तीचा सोमनाथ सुभाष बडदाळे हा मित्र असल्याचे माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती. मयताचे मोबाईल आरोपी घेऊन गेला असल्याचा संशय आल्याने तांत्रीक तपासा व्दारे व आसपासचे राहणारे लोकांकडून तपास करून मयताचा मित्र सोमनाथ सुभाष बडदाळे याचेवर संशय आल्याने त्याचा शोध घेत असताना सायंकाळी कोयते वस्ती पुनावळे येथे सापळा रचून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी बडदाळे यास शिताफीने ताब्यात घेतले त्याचे ताब्यामध्ये मयताचा मोबाईल मिळुन आल्याने आरोपीकडे चौकशी केली असता आरोपी याने कबूल केले की, राजेश जाधव हा त्याचा मित्र होता दोघांमधील पुर्व वैमण्यास्यातून व दारू पिण्याच्या वादा वरुन राजेश जाधव धक्का देवुन खाली पाडुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारला व त्यास गंभीर जखमी करून खुन केला. सोमनाथ सुभाष बडदाळे यास ताब्यात घेवुन रावेत पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर कामगीरी मा. श्री. विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त सो. पिं चिं शहर, मा.श्री मनोज लोहीया सह. पोलीस आयुक्त सो. पिं चिं शहर, मा. श्री संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त सो. पिं चिं शहर, मा. श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त सो परि-०२ पिं चिं शहर, मा. श्री पदमाकर घनवट सहाय्यक पोलीस आयुक्त सो. देहुरोड विभाग पिं चिं शहर, मा. श्री शिवाजी गवारे वपोनि सो. रावेत पोलीस ठाणे पिं चिं शहर यांच्या मार्गदर्शना खाली तपास पथकातील श्री विशाल जाधव सपोनि सो. रावेत पोलीस ठाणे, श्री. परवेज शिकलगार सपोनि पोहवा कोळगे, पोहवा तिटकरे,पोशि जाधव, पोशि राउत, पोशि तांबे, पोशि ब्राम्हण, पोशि वाकडे, पोशि रणदिवे, पोशि देवकर यांनी केली आहे.

Exit mobile version