मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या हस्ते पोलीस स्टेशन मध्ये बालस्नेही कक्षाचे झाले उद्घाटन..!!

समर्थ, मुंढवा, कोंढवा, वानवडी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी व हडपसर पोलीस स्टेशन येथे बालस्नेही कक्षाची स्थापना..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – १ मधील समर्थ पोलीस स्टेशन येथे व परिमंडळ-५ मधील मुंढवा पोलीस स्टेशन येथे बालस्नेही कक्षाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी परिमंडळ-५ मधील मुंढवा, कोंढवा, वानवडी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, हडपसर पोलीस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेले बालस्नेही कक्षाचे उद्घाटन झाले असल्याचे मा. पोलीस आयुक्त यांनी औपचारिकरित्या घोषणा केली. होप फॉर दी चिल्ड्रेन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ पोलीस स्टेशन पैकी २३ पोलीस स्टेशनमध्ये बाल स्नेही कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.

बालस्नेही कक्षामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालकांचे समुपदेशन व वेग-वेगळया स्वययंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशनल कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन, त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता मदत केली जाते. त्याकरिता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सर्व पोलीस स्टेशन मध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.

सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. रंजन शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- १ श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री. अशोक धुमाळ व समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश शिंदे, मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णु ताम्हाणे, भरोसा सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे, श्रीमती. संगिता जाधव व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती. कॅरॉलीन व त्यांची टीम इतर ग्रामस्थ तसेच बाल वृंदावन उपस्थित होते.

Exit mobile version