माहिती अधिकारातील कागदपत्र देण्यासाठी मागितली लाच तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात..!!

माहिती अधिकारातील कागदपत्र देण्यासाठी मागितली होती लाच..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तक्रारदार यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागितली होती ती माहितीचे कागदपत्र विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश असताना, लोकसेवक संजय दाते, तलाठी उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे यांनी सदरची माहिती देणेकरीता २,०००/- रुपये लाच मागणी केल्याची होती. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी यासंदर्भात तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचेकडे लोकसेवक दाते यांनी माहिती अधिकारातील कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी ९४२/- रुपये लाचेची मागणी केली. त्या लाच मागणीस कोतवाल भंडलकर यांनी सहाय्य केले म्हणून दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम – ७, १२. प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा करण्यात आला असून, त्यामध्ये तलाठी दाते यांना अटक करण्यात आली आहे. ला. प्र. वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार हे पुढील तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

Exit mobile version