मानवी हक्कांचे संरक्षण केवळ कायद्यातील तरतुदीने होणार नाही – डॉ. सुधाकराव जाधवर

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था , जाधवर ग्रुप, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुधाकरराव जाधवर म्हणाले की, मानवी हक्कासाठी खुप महत्वपुर्ण कायदे असले तरी मानवी हक्कांचे संरक्षण केवळ कायद्यात तरतुद आहे म्हणून होणार नाही. त्यासाठी समाज हक्का बरोबरच कर्तव्याने जागृत होयाला हवा यासाठी ही मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था संस्था चांगले कार्य करीत आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुन मोबाईल व्यसनी बनला आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल आणि मानवी हक्कांचे संरक्षण करायचे असेल तर मोबाईल व्यसनमुक्ती चळवळ उभी करावी लागेल असे जेष्ठ लेखक, उद्योजक इतिहासकार नामदेवराव जाधव यांनी मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्ते अॕड. राजेंद्र अनभुले की, जनहित याचिका या नागरीकांच्या मुलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधि क्षेत्रात प्रमुख भुमिका बजावत असल्या तरी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाकडून होईलच असे होत नाही. यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. शासकीय यंत्रना कायदा अमंलबजावणीकडे दुर्लक्ष करतात तेंव्हा राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आणि कायदा अज्ञानी समाज आपल्या हक्क व अधिकारापासून वंचित राहात आहे.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधितज्ञ गायत्री सिंग यांनी मत मांडले, पोलिस उपआयुक्त शशिकांत बरोटे यांनी ‘संघर्ष मानवी हक्कांचा’ विकास कुचेकर व आकाश भोसले यांनी लेखन संकलन केलेल्या व शब्द वैभव प्रकाशनातून प्रिंट केलेल्या पुस्तकाचे कौतूक केले.तसेच संस्थेच्या कार्याला शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमात मानवाधिकार पुरस्कार प्रदान (विधी क्षेत्रातून) – मा.अॕड राजेंद्र अनभुले, (सामाजिक क्षेत्रातून) अमृता करवंदे,(सामाजिक ग्रामीण क्षेत्रातून) – राजू केळकर, (कला क्षेत्रातून) चित्रपट दिग्दर्शक- राजेंद्र बरकडे,(शैक्षणिक) क्षेत्र संजय ढवळे, (क्रीडा क्षेत्रातून) -प्रशांत आबने यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार (साहित्य क्षेत्रातून) दीपा देशमुख आणि (बालहक्क कार्यकर्ते) सुशांत आशा यांना सन्मानित करण्यात आहे. या पुरस्कार प्रदान डॉ सुधाकरराव जाधवर(माजी व्यवस्थापन सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), शशिकांत बोराटे (उपआयुक्त पुणे),नामदेवराव जाधव (लेखक,वक्ते उद्योजक ) ,अॕड गायत्री सिंग (जेष्ठ विधितज्ञ उच्च न्यायालय मुंबई),ऍड शार्दूल, डॉ यामिनी अडबे प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले,या पुरस्कारा मागिल भावना मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करीत असलेल्या मान्यवरांचा गौरव, सन्मानामागील भावना प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन संचालक अण्णा जोगदंड,महाराष्ट्र सचिव अण्णा मंजुळे,मुख्य सल्लागार अनिल कदम,आकाश भोसले महाराष्ट्र सल्लागार कमिटी,मुख्य सचिव सोमनाथ सावंत,मुंबई प्रांत अध्यक्ष शकील शेख ,महाराष्ट्र सचिव नितीन काळे संजना करंजावणे, अॕड. रुपाली वाईकर, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, विकाश शहाणे, नंदकुमार ढसाळ , परशुराम पाटील सार्व सभासद पदाधिकारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सचिन दुर्गाडे, अभिनेता सुभाष यादव, यांनी केले

Exit mobile version