मातंग समाजातील विधवा महिलेला पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षकाची शरीर सुखाची मागणी

ॲट्रॉसिटी, विनयभंग व खंडणी मागितल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातंग समाजातील विधवा महिलेवर पुणे महानगरपालिका कंत्राटी ठेकेदार शिवाजी सूळआरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांनी शरीर सुखाची मागणी केली, मागणीला नकार दिल्याने 500 रुपये दरमहा खंडणी मागितल्याने जातीय अत्याचार केल्याप्रकरणी अधिकारी मंगलदास माने व ठेकेदार शिवाजी सूळ यांचेवर ॲट्रॉसिटी, विनयभंग व खंडणी मागितल्याप्रकरणी बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६४१/२३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. फिर्यादी या असहाय व विधवा असल्याचे माहिती असताना मंगलदास माने याने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच पैशांची मागणी केली. त्या सुट्टीवरुन १० एप्रिल रोजी परत आल्यावर हजर होण्याची चिठ्ठी घेण्यासाठी ठेकेदार शिवाजी सुळ याच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्याने फिर्यादी यांना तू माने साहेबांकडे जा, तुम्ही जातीवर जाणार असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत पिडीत महिला यांनी दोघांविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. तर हा तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे याने धमकी दिली होती.

पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शिरगावकर करीत आहेत.

Exit mobile version