ताज्या घडामोडीपुणे

महिलेचा विनयभंग व मारहाण करुन पळुन गेलेल्या आरोपीस केले जेरंबद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- आरोपी मोहम्मद उर्फ लगडया रज्जाक शेख हा घराच्या शेजारी राहणा-या महिलेकडे लव्हशिपची मागणी करत होता. त्या महिलेने त्यास विरोध केला म्हणून आरोपी याने चिडुन त्या महिलेचा विनंयभग करुन तीला मारहाण केली होती. या घटनेबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ४५२/२०१७, भा.द.वि.स. कलम ३५४, ३२४, ५०४ प्रमाणे महिलेने तक्रार दिली होती. तेव्हापासून आरोपी हा फरार होता.

मा. पोलीस आयुक्त यांनी गुन्हयात पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस ठाणेस आदेशित केले होते.

वरीष्ठांच्या आदेशानुसार तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे तपास पथक अंमलदार असे वेळोवेळी पाहिजे फरारी आरोपी यांचा गुप्त माहिती काढुन शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार, महेश वाघमारे व गणेश चिंचकर यांना कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल असणान्या गुन्हयातील आरोपी मोहम्मद उर्फ लगडया रज्जाक शेख, वय – ३२ वर्षे, हा सहा वर्षापासुन फरारी असुन तो हनुमाननगर वसाहत, तुर्भे नाका, वाशी, नवी मुंबई येथे राहत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती.

नमुद आरोपी यास हनुमाननगर वसाहत, तुर्भे नाका, वाशी, नवी मुंबई येथे जावुन स्थानिक पोलीसाच्या मदतीने आरोपी यांचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेवुन, कोंढवा पोलीस ठाणे येथे नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार, अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे, जयदेव भोसले यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!