महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केला सादर..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर केला आहे.

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल. यातून अर्थव्यवस्था गरूडझेप घेईल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री यांनी अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणीकरिता कृती आराखडा तयार करण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती काम करेल, असे जाहीर केले आहे.

आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल आणि त्यातील शिफारशीतून आपण निःसंदिग्धपणे ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या दिशेने पावले टाकणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून मंत्रालयाच्या बाहेर आपल्या जीडीपी ग्रोथची माहिती देणारे घड्याळ बसवण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण, संतुलित विकासाचा ध्येय साध्य करणारा हा अहवाल आणि त्यातील शिफारशी आहेत. यातून महाराष्ट्र आपल्या ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य २०२८ पर्यंत साध्य करेल – महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन

Exit mobile version