संपादकीयसामाजिक

महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन हक्कचा लढा उभरण्याची काळाची गरज..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- महाराष्ट्रामधील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येण्याची ही काळाची गरज असून विविध संघटना काढून जे विखुरले गेलेले पत्रकार बांधव आहेत यांनी खरंच एकत्र येऊन एका छत्र छाया खाली हक्काच्या लढ्यासाठी उभे राहिले पाहिजे आपल्या पत्रकावर बांधवांमध्ये एकत्रित न राहण्याची जी दरी निर्माण केलेली आहे त्यामुळे इतर जे लांडगे आहेत ते फोफवलेले आहेत.असंख्य पत्रकार बांधवांवर हल्ले होतात तसेच कट रचून मृत्यू देखील केला जातो. आत्ताच ज्वलंत उदाहरण दयायचे तर रत्नागिरी मधील पत्रकार बांधवाची घटना डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. आपण पत्रकार बंधू जर एकत्रित आलो तर आज पर्यंत आपल्याला ज्या योजना अद्याप सरकारने दिलेल्या नाहीत मानधन योजना, पेन्शन योजना, गृह योजना, प्रवास योजना, कर्ज योजना, सरकारने आत्तापर्यंत पत्रकार बंधूंच्या हिताचा निर्णय घेतलाच नाही असं का? आणि जरी घेतला असेल तरी तो आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही असं का?

पत्रकार एक संविधानामधील चौथा स्तंभ म्हणून लोकशाही बळकट करण्याचे काम करत आहे. अन्याय अत्याचार आपल्या लेखणी द्वारे न्याय देण्याच्या भूमिकेत आहे असं सर्व असताना त्या पत्रकार बंधूंना कुठल्याही प्रकारचे योजना ग्रामीण भागातील गरीब पत्रकार बंधू हा तर घरावरती तुळशी पत्र ठेवून काम करतो ही वस्तुस्थिती आहे पत्रकार बांधव हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आपल्या लेखणीतून नेहमी आवाज उठवत असतो.परंतु हे करत असताना त्याला पण एक कुटुंब आहे ते चालवण्यासाठी त्याला आर्थिक मदत कुठूनच होत नाही जाहिरातीच्या स्वरूपात थोडेफार मदत झाली तरच भ्रष्टाचार बाहेर काढला तसेच एखादे प्रकरण उघडकीस आणले तर त्याला खंडणी सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकतात. शासनाकडून किंवा व्यापाऱ्यांकडून त्या पत्रकारांना जाहिराती मदत जर मिळत नसेल तर त्या पत्रकारांना नेमकं करायचं काय? तसेच तमाम महाराष्ट्र मधील अनेक पत्रकार बंधू हाताश तसेच हतबल झालेले आहेत. त्याचा फायदा इतर राजकीय लोक पण घेत असतात. त्याने कंटाळून हे क्षेत्र सोडण्याचा जर विचार केला एखाद्या ठिकाणी नोकरीला जरी गेला तरी तेथील मालकाला समजले हा पत्रकार आहे तर त्याला वाटतं हा काहीतरी उघड करण्यासाठी आलेला आहे म्हणून त्याला कामावरून देखील काढून टाकले जाते. असे अन्याय पत्रकार बंधू वरती व त्याच्या कुटुंबावर ती होत आहे पत्रकारिता करत आहे त्याचा काय गुन्हा झाला का? लोकशाही बळकट करीत असताना त्याच्यावर होणारा अन्याय तो विसरला आहे की काय? अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बंधूंची झालेले आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे तसेच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा प्रिंटमध्ये असेल आपण बंधू आहोत त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करू राजकारणी मंडळी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या बंधूंमध्ये भांडणे लावतात जेवढे आपले पत्रकार बंधू वेगवेगळ्या संघटना बनवून वेगळे होतील तेवढा फायदा ते राजकीय पुढारी घेतील मी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना आव्हान करतो की आता तरी जागे व्हा! हीच वेळ आहे एकत्र येण्याची!चला तर सर्वांनी जागे व्हा! एक मूठ एकत्रित या! महाराष्ट्रात आपल्या हक्कासाठी एक मोठा लढा उभा करूया!

मी महाराष्ट्र मधील तमाम पत्रकार बांधवांना आव्हान करतो की पत्रकार बांधवांनी या लढ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे!लवकरच आपल्या हक्कासाठी व हक्क मिळवण्यासाठी एकत्र येऊन मुंबई मंत्रालयावरती एक विचाराने एक विराट मोर्चाचे आयोजन करीत आहोत तरी या ऐतिहासिक महामोर्चा मध्ये तमाम पत्रकार बांधवांनीं आपल्या हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा व ऐतिहासिक पत्रकारांच्या महा मोर्चाचे साक्षीदार व्हावे..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!