महापुरुषांच्या बाबतीत जाणीवपूर्वक अवमान वक्तव्य केल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय निषेध आंदोलन..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या बाबतीत जाणीवपूर्वक अवमान वक्तव्य केल्याबद्दल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने तीव्र आंदोलन आज दुपारी एक वाजता वारजे ब्रिज खाली करण्यात आले.

आंदोलनामध्ये चंद्रकांत पाटील च्या फोटोला जोडे मारले तसेच त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी तसेच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीम अनुयायी यांनी केली असून या आंदोलनाला आंबेडकरी चळवळीतील आरपीआय नेते निलेश अण्णा आगळे, अरविंद भाऊ शिंदे,अंकुश भाऊ सोनवणे, दत्ताभाऊ चव्हाण, अजयजी भालशंकरकिशोर कांबळे, दीपालीताई चव्हाण विशाल भाऊ ओवाळ ,संजय भाऊ दिवार, सुभाषजी सहजराव ,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र सचिव बापूसाहेब लष्करे ,पुणे शहर अध्यक्ष नानासाहेब ओहोळ, राष्ट्रवादी संघटक सचिव पुणे शहर गुणवंतजी घोडके, मनीषा हटकर ,फरीदा इनामदार, माझी झेडपी सदस्य प्रभाकर बोरखडे ,बहुजन भीमसेनेचे शहराध्यक्ष अश्विन जी ढगे आम आदमी पार्टीचे निलेश भाऊ वांजळे, काँग्रेस पक्षाचे आमिरजी चौधरी, चंद्रकांत कांबळे, भालचंद्र घाडग व शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version