आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मत्स्य रोगांची माहिती तातडीने मिळावी आणि वेळेवर वैज्ञानिक सल्ला प्राप्त व्हावा याकरिता मोबाईल ॲप विकसित..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. त्याचबरोबर हे क्षेत्र देशातील सुमारे 3 कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविका आणि रोजगार प्रदान करते. या क्षेत्रात विकासाची अफाट क्षमता असून या क्षेत्रात नील क्रांती घडवून आणण्यासाठी भारत सरकारने 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक प्रमुख योजना “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)) लागू केली आहे. मत्स्यपालन आणि मत्स्यसंपदा क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक असलेली देशातील ही प्रमुख योजना ठरली आहे.

मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक गंभीर अडथळा ठरत आहे आणि जलचर प्राण्यांच्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा रोगांच्या नियंत्रणासाठी लवकर शोध घेणे महत्त्वाचे मानले जाते आणि देखरेख  ठेवण्याच्या सुरचित कार्यक्रमाद्वारेच ते साध्य करता येऊ शकते.

यादृष्टीने  “रिपोर्ट फिश डिसीज” ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नुकतेच सुरू केले आहे. या नाविन्यपूर्ण ॲपचा उपयोग करून, शेतकरी त्यांच्या शेतातील फिनफिश, कोळंबी आणि मोलस्कमधील रोगाची प्रकरणे क्षेत्रीय अधिकारी आणि मत्स्य आरोग्य तज्ञांना कळवू शकतील आणि रोग समस्या त्वरित सोडवण्यासाठी वैज्ञानिक सल्ला मिळवू शकतील. हे ॲप मत्स्यपालक, क्षेत्रस्तरीय अधिकारी आणि मत्स्य आरोग्य तज्ञांना जोडण्यासाठी एक मध्यवर्ती व्यासपीठ ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!