मटका जुगार खेळायचा आहे, तर मग या येरवड्याला…!

जजमेंट फेल तर येरवडा जेल..आत्ता तरी बोलायची सोय राहिली नाही..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- जजमेंट फेल तर येरवडा जेल..! असे म्हणायची आता तरी सोय राहिली नाही याचे कारण येरवडा मध्ये बिनधास्त चालू आहेत अवैध्य धंदे यात मटकाजुगार म्हणू नका की कालापीला किंवा टायगर की अवैध्य लाॅटरी सर्वच काही राजरोस पणे सुरू आहे म्हणून म्हटलंय की येरवडा जेलची भिती अवैध्य कृत्य करणार्यांना हवी होती परंतू अवैध्य धंद्यांचे माहेरघर येरवडाच बनले आहे.

 

येरवडा संगमवाडी बस स्थानक सर्वांनाच माहिती असावे येथून महाराष्ट्रातील गावोगावी जाण्यायेण्याचा खाजगी बस सुविधा उपलब्ध असते हजारो प्रवासी येथून आपल्या गावी किंवा कामानिमित्त बाहेर गावी जात येत असतात याचाच फायदा घेत या सर्वसामान्य प्रवाश्यांना लुटण्यासाठी संगमवाडी पार्किंग क्रमांक 1 मध्ये संध्याकाळी 4 ते 5 वाजल्यापासुन रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत कालापिला किंवा टायगर नावाचा जुगार सुरू असतो ह्या जुगाराच्या खेळात सुरूवातीला थोडे पैसे जिंकवून देण्यात येते व नंतर भांडणे करूनही खिश्यातील सर्व पैसे लुट होईपर्यंत सुट्टी मिळत नाही. शेवटी प्रवासी एकतर बाहेर गावचा किंवा बसच्या वेळेची मर्यादेमुळे कोणी हुज्जत घालण्यापेक्षा आपलीच जिरली म्हणून निमूटपणे निघून जातात. या टायगर किंवा कालापिलाची सामाजिक कार्यकर्त्यांकडून आजही तक्रारीची नोंद आहे.

याच सोबत येरवड्यातील रेड्डीज रेस्टॉरंट समोर, MS वाईन शाॅप शेजारील गाळ्यामध्ये तर येरवडा पुलाच्या सिंगनल पासुन गुंजन थिएटर जवळील भाजी मंडई, मार्केट मध्ये अनेक अवैध्य लाॅटरी सेंटर आहेत. सिध्दार्थनगर सार्वजनिक शौचालय समोर मटकाजुगार अठ्ठा सुरू आहे, भाजीमंडईमध्ये मटका जुगार तर श्रीकृष्ण मंदिरा मागे मटका जुगार अठ्ठा सुरू आहे.

एका येरवडा मध्ये येवढे मटका जुगार सुरू असल्यास मटकाजुगारी साठी येरवड्याला स्वर्गच म्हटले तर वावगे ठरू नये यापूर्वीही येरवडा पोलीस स्टेशन कडील वसुली अधिकारी यांच्या नावासहीत सामजिक कार्यकर्त्याकडून तक्रारी पोलीस प्रशासनाकडे दाखल आहेत व वर्तमान टाईम्स मध्येही दिलेल्या तक्रारी संदर्भात बातमी प्रसारित आहे परंतू नागरिक भोळे आहेत काही दिवस अवैध्य धंदे बंद करून पुन्हा राजरोसपणे सर्व अवैध्य उद्योग सुरू करण्यात आलेले आहेत.

पोलीस प्रशासनाकडील वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार दाखल आहेत तरी याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन अवैध्य धंदे करणारे चालक मालक व यांना पाठबळ देणारे वसुलीबाज यांच्यावर कठोर कारवाई होते का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version