मटका,जुगार, पंतीपाकुळी, सोरट अड्डयावर सामाजिक सुरक्षा पथकाकडून कारवाई..!!

२३ इसमांना ताब्यात घेवुन सिहंगड रोड पोलीस स्टेशन येथे जुगार बंदी अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल.!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सिंहगड रोड, परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबतची गोपनिय बातमी बातमीदारा मार्फत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हेशाखा यांना मिळाली. बातमी ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही व्यक्ती बेकायदेशीर मटका, पंती पाकुळी सोरट जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका, पंती पाकुळी सोरट जुगारातील रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,३१,४२०/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या छाप्यात २३ इसमांविरूध्द सिहंगड रोड पोलीस स्टेशन येथे गुरनं ५२२/२०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे, श्री. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.विजय कुंभार तसेच स.पो.निरी. अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version