पुणे

मकोका गुन्हयातील आरोपीस पळुन जाण्यास मदत करणारे आरोपींना केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मा.श्री.गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट – ०४, पुणे शहर यांनी अभिलेखावरील आरोपी यांचा शोध घेऊन मिळुन आल्यास पुढील कायदेशीर कारवाईचे व गंभीर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.

प्राप्त आदेशाप्रमाणे सहा. पोलीस फौज महेंद्र पवार, पोलीस अंमलदार, संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे हे पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ०८ ते १० दिवसांपुर्वी मकोका गुन्हया मधील आरोपी संतोष पवार यास पुणे ग्रामीण हद्दीतील खानापुर येथे तपासा करीता आणले असताना त्यास पोलीसांच्या कस्टडीतुन गाडीवरुन पळवुन नेणारे चिक्या रणधीर व पिल्लुडया धिवार हे बोपोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे शेजारील पान टपरी जवळ उभे आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली, मिळालेल्या बातमी नुसार आरोपी प्रणव ऊर्फ चिक्या अर्जुन रणधीर, वय- १९ वर्षे, तन्मय ऊर्फ पिल्लुडया तानाजी धिवार, वय- १९ वर्षे यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन, त्यांचेकडे प्राथमिक तपास केला असता मार्केटयार्ड पोलीस ठाणेकडील मकोका कारवाई मधिल पोलीस कस्टडीतील आरोपी संतोष बाळु पवार, वय २३ वर्षे व साई राजेंद्र कुंभार, वय- १९ वर्षे यांना दिनांक ०३/०२/२०२३ रोजी खानापुर, ता. हवेली, जि. पुणे येथे मकोका गुन्हयाचे तपासा करीता पोलीसांनी आणले होते त्यावेळी संतोष पवार याने पोलीसांना ढकलुन त्यांच्या हातातील बेडीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलीसांना मारहाण केली व स्वतःची सुटका करुन घेतली. प्रणव ऊर्फ चिक्या अर्जुन रणधीर व तन्मय ऊर्फ पिल्लुडया धिवार या आरोपींनी संगनमत करुन पोलीसांचे कायदेशीर रखवालीतील आरोपी संतोष पवार यास स्कुटरवर ट्रिपल सिट बसवुन पळुन जाण्यास मदत केली.

सदरबाबत हवेली पोलीस ठाणे गु.र.नं.४२ / २०२३, भा.द.वि. कलम ३०७, ३५३,३३२, २२४, २२५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन ते यापुर्वी दाखल असलेल्या हवेली पोलीस ठाणे गु.र.नं. ०६/२०२३, भा.द.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, क्रिमिनल लॉ ॲमें. अॅक्ट सन २०१३ चे कलम ३ व ७ भारताचा हत्यार कायदा कलम ४/२५ या गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याने, त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता हवेली पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास हवेली पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, विनोद महाजन व स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!