ताज्या घडामोडीपुणे

मंडल अधिकाऱ्यावर लाच स्वीकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडून कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मौजे भडवली तालुका मावळ येथील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्याकरीता लोकसेवक – संगीता राजेंद्र शेरकर, वय – ५४ वर्षे, मंडल अधिकारी, मौजे शिवणे ता. वडगांव मावळ यांनी २०,०००/- रूपये लाचेची मागणी करत होते लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे यांच्या कडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक – संगीता शेरकर व खाजगी इसम संभाजी लोहोर यांनी २०,०००/- हजार रूपये लाचेची मागणी करून लोकसेवक संगीता शेरकर यांनी लाच स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३/२०२२ कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पुढिल तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!