मंगवारपेठेत गंभीर दुखापत करून फरार झालेले २ आरोपी जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

सोमेश्वर मंदिराच्या आवारात फिर्यादी किर्तीकुमार सतिश जाजु यांचे गोडावुन आहे. गोडावुन मध्ये माल उतरवित असताना फिर्यादी हे त्यांचे कामगारांना या ठिकाणी थुंकुन घाण करतात त्या बाबत मंदिराचे पुजारी बडबड करीत होते असे सांगत असताना पुजारी यांचा नातु तेजस व मुलगा सचिन रसाळे यांनी बाचाबाची करुन कंबरेच्या पटयाने,लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉडने साथीदारासह मारहाण करुन गंभीर जखमी केले त्याबाबत फरासखाना पोलीस ठाणे येथे गुरनं २३६/२०२२ भादवि कलम ३२६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर गुन्हा दाखल झाले पासुन संशयित आरोपी फरारी होते.

दिंनाक ०७/१२/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट १ पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी तेजस व सचिन रसाळे हे शालिनी हॉटेल रास्ता पेठ पुणे येथे मामास भेटण्यासाठी येणार असल्याबाबतची बातमी मिळाली तात्काळ युनिट १ कडील स्टाफ सह शालिनी हॉटेल रास्ता पेठ पुणे येथे सापळा रचुन थांबले, बातमीप्रमाणे आरोपी तेजस व सचिन रसाळे हे येताना दिसले व ते शालिनी हॉटेल समोर रोडवर कोणाची तरी वाट पाहत उभे राहिले असताना आरोपी तेजस अजित वाडेकर वय २२ वर्ष व सचिन अजित रसाळे वय ३९ वर्ष यास ताब्यात घेण्यात आले त्यास युनिट १ गुन्हे शाखा पुणे येथे आणुन फरासखाना पोलीस ठाणे येथे गुरनं २३६ / २०२२ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी फरासखाना पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री संदिप भोसले, सहा. पो. निरी आशिष कवठेकर, पो. उप निरी सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, महेश बामगुडे, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Exit mobile version