भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाची दबंग कामगिरी, सहा लाख रूपये किंमतीच्या तब्बल १३ मोटर हस्तगत..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भोसरी, महाळुंगे, चिखली, एम. आय. डी. सी. भोसरी, दिघी परिसरात मोटार सायकली चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करून त्याचेकडून सहा लाख रूपये किंमतीच्या तब्बल १३ मोटर सायकली हस्तगत करण्यात भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाला यश आले आहे.

भोसरी पोलीस स्टेशन हददीत वारंवार होत असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचे बाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव यांनी भोसरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस सपोनि श्री कल्याण घाडगे व पोलीस उप-निरीक्षक श्री मुकेश मोहारे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाची दोन टीम तयार करून मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध सुरु केला होता.

पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे यांचे नेतृत्वाखालील टीम तपास करीत असताना टिम मधिल अंमलदार पोलीस अंमलदार सागर जाधव व आशिष गोपी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरून भोसरी पोलीस ठाणे परिसरात मोटर सायकली चोरी करणारा व्यक्ती वाहन विक्री करण्याकरीता भोसरी स्मशानमुमीजळव येत असल्याची माहिती मिळाली त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव यांचे तपास पथक अधिकारी श्री. कल्याण घाडगे व मुकेश मोहारे यांनी लागलीच तपास पथकातील दोन्ही टिम मिळाल्या बातमीचे ठिकाणी घेवुन जावुन सापळा लावून आरोपी रामेश्वर नवनाथ अडकिने यास ताब्यात घेतले व त्याचेकडे कसोशीने चौकशी करुन तपास केला. त्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हददीत भोसरी, भोसरी एम.आय.डी.सी., दिघी, चिखली, महाळुगे, चाकण पोलीस स्टेशन हददीत व पिंपरी चिंचवड परिसरातील मोटार सायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे त्यास भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक ९३७/२०२२ भादवी कलम ३७९ या गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हददीत व भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोटार सायकली चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी रामेश्वर नवनाथ अडकिने हा भोसरी, दिघी, एम.आय.डी.सी. भोसरी, चिखली, महाळुंगे चाकण या परिसरात त्याचे साथीदार परशुराम कांबळे रा. भोसरी पुणे याच्या सोबत मिळून चोरी करणारा अटल मोटर सायकल चोरटा आहे त्याने आत्ता पर्यंत मोटार सायकली चोरीचे एकुण ०८ गुन्हे केले आहेत. या आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकूण १३ मोटार सायकली असा एकुण ६,००,०००/- रुपये किं.चा मुददेमाल हस्तगत करणेत आलेला असुन खालील प्रमाणे ०८ गुन्हे उघडकिस आणलेले आहेत.

१) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३७ / २०२२ भादवि कलम ३७९

२) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८/२०२२ भादवि कलम ३७९

३) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९७२/ २०२२ भादवि कलम ३७९

४) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३१ / २०२२ भादवि कलम ३७९

५) चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४९ / २०२२ भादवि कलम ३७९

६) दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६१ / २०२२ भादवि कलम ३७९

७) चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. १५४४ / २०२२ भादवि कलम ३७९

८) भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०९/२०२२ भादवि कलम ३७९

सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहिया सो, सह पोलीस आयुक्त मा. श्री संजय शिंदे सो अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. विवेक पाटील, पोलीस उपायुक्त परि १ मा श्रीमती प्ररणा कट्टे सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, श्री. भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. कल्याण घाडगे, पोउपनि श्री. मुकेश मोहारे, सहा. फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, अजय डगळे, रविंद्र जाधव, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, प्रभाकर खाडे, सागर जाधव, आशिष गोपी, संतोष महाडीक, सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

Exit mobile version