भारत आणि सौदी अरेबिया मध्ये वीज आंतरजोडणी , हरित/स्वच्छ हायड्रोजन पुरवठय़ासाठी झाला सामंजस्य करार

“भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय”

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भारत आणि सौदी अरेबियाने आज रियाध येथे वीज आंतरजोडणी , हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.  या सामंजस्य करारावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले आलेले ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान अल-सौद यांनी आज रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह (MENA ) च्या निमित्ताने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

वीज आंतरजोडणी  क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करणे आहे; मागणी अधिक असताना  आणि आपत्कालीन परिस्थितीत विजेची देवाणघेवाण; प्रकल्पांचा सह-विकास; हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेची सह-निर्मिती ; आणि हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या सामग्रीची सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी स्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या वर-उल्लेखित क्षेत्रांमध्ये संपूर्ण पुरवठा आणि मूल्य साखळी प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान  B2B उद्योग परिषदा आणि नियमित B2B परस्परसंवाद आयोजित केले जातील असा निर्णयही दोन्ही ऊर्जा मंत्र्यांनी घेतला.

Exit mobile version