भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात बुडणाऱ्या मासेमारी नौकेतून सहा मच्छिमारांची केली सुटका..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बुडत असलेल्या मासेमारी नौकेतून, आरुष या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने, काल 07 मार्च 2023 रोजी, सहा मच्छिमारांची सुटका केली आहे.

गुजरात किनाऱ्यापासून 80 किलोमीटर अंतरावर समुद्रात हिमालय ही भारतीय मासेमारी नौका, पाणी नौकेत  शिरल्यामुळे बुडू लागली होती. या संकटाची माहिती देत मदतीची याचना करणारा संदेश पहाटेच्या सुमारास, आयुष या भारतीय तटरक्षक दलाच्या अरबी समुद्रात तैनात जहाजाला मिळाला. त्यानंतर जहाज तातडीने संकटात सापडलेल्या या नौकेकडे पोहोचलं आणि सर्वप्रथम, बुडणाऱ्या नौकेतून पाण्याचा निचरा करत नौकेवर कार्यरत खलाशांची सुटका केली.  नंतर तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांनी बुडणारी नौका पूर्ववत करत कार्यान्वितही केली आणि चालक दलाच्या स्वाधीन केली आहे.

Exit mobile version