भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) टेबल टेनिस स्पर्धेचे केले आयोजन..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भारतीय आयुर्विमा महामंडळाने 07-10 फेब्रुवारी दरम्यान गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या, फातोर्डा स्टेडियम येथे अखिल भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील टेबल टेनिस स्पर्धा 2022-23 चे आयोजन केले आहे.

अखिल भारतीय सार्वजनिक क्षेत्र क्रीडा नियंत्रण मंडळाच्या वतीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या क्रिडा प्रोत्साहन मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

एलआयसीचे कार्यकारी संचालक संजय दिक्षित यांनी स्पर्धेचे आज उद्घाटन केले.

भारतीय आयुर्विमा महामंडळ हे 1987 पासून अखिल भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील क्रीडा नियंत्रण मंडळाचे संस्थापक सदस्य आहेत. AIPSSCB सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर खेळ, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम तसेच ललित कला यांना सहाय्य करणे, प्रोत्साहन देणे आणि खेळांचे आयोजन करणे, यासाठी प्रयत्नशील असते. आजपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील संलग्न असणाऱ्या 25 उपक्रमांपैकी एलआयसी, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अन्नधान्य महामंडळ, कर्मचारी राज्य विमा निगम, बँक ऑफ बडोदा, भारत हेवी इलेक्ट्रीक लि, बीएसएनएल, सीआयएल, ईपीएफओ, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएलसी, ऑईल इंडिया लि., माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अशा 13 संस्थानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

Exit mobile version