“फुले शाहू आंबेडकर” वारजे माळवाडी कृती समिती च्या वतीने 25 डिसेंबर स्त्रीमुक्ती दिनानिमित्त भिम वाघिणी यांचा गौरव..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पंचशील बुद्ध विहार, वारजे माळवाडी, रामनगर कॅनल रोड येथे मा. सहाय्यक निरीक्षक पोलीस तृप्ती पाटील यांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून अन्याय विरुद्ध बुलंद आवाज उठवणाऱ्या तोफ असणाऱ्या भिम वाघिणी यांचा गौरव करण्यात आला.

आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा संस्थाच्या विद्यमानाने “फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्वपक्षीय संघटना वारजे माळवाडी कृती समिती च्या वतीने 25 डिसेंबर स्त्रीमुक्ती दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली मनुस्मृतीदहन करून स्त्रियांना चूल आणि मूल या मनुस्मृतीच्या रूढी परंपराच्या कायद्यातून मुक्त करून स्त्रियांना मानाचे स्थान निर्माण करून दिले.

25 डिसेंबर स्त्रीमुक्ती दिन महिलांचा गौरव दिन म्हणून महिलांचा सत्कार सन्मान प्रमुख पाहुणे वारजे पोलीस सहाय्यक निरीक्षक मा. तृप्ती पाटील, प्रमुख पाहुणे महिला उद्योजक सुरेखाताई गायकवाड सामाजिक वृत्तस कार्यकर्त्या भीमाची वाघीण दिपालीताई चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपालीताई धीवार व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अजय भाऊ भालशंकर या मान्यवरांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून अन्याय विरुद्ध बुलंद आवाज उठवणाऱ्या तोफ असणाऱ्या भिम वाघिणी मनिषा ताई हटकर सिंधुताई मुरकुटे, फरीदा इनामदार, शालन ताई मुंडे, पूजा ताई डावरे, सारिका ताई भोसले लक्ष्मीताई घोडके, सुनीताताई वाघमारे, रेश्माताई बागवान, अस्माताई सय्यद इत्यादी महिलांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित कृती समिती वारजे पदाधिकारी कार्यकर्ते दत्ताभाऊ चव्हाण, श्रीकांतभाऊ दारोळे, सुभाष सहजराव, संजय दिवार, निलेश आगळे, किशोर पंडागळे, विशाल ओव्हाळ, अश्विन ढगे, अरविंद शिंदे, अमोल काळे, योगेश सुरवसे, बाप्पा चव्हाण, पाटोळे मनोज भालेराव, वैशालीताई भालेराव, उमाताई भालशंकर, दिपाली वाघमारे यदि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version