प्राधिकरण निगडी परीसरातुन एकाच दिवशी दोन कार चोरी करणाऱ्या आरोपीस राजस्थान येथून अटक..!!

20 लाख रूपयांच्या दोन कार जप्त पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ची उल्लेखनिय कामगिरी.!

वर्तमान टाईम्स |वृत्तसेवा :- दि. 05/12/2022 रोजी से. नं. 27, शरद हौसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे राहणारे हेमंत यशवंत भोसले यांची हुन्डाई आय.-20 कार तसेच नितीन नितीन माणिकराव पवार यांची हुन्डाई क्रेटा अशा दोन कार रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये पार्क केलेल्या असताना चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. त्याबाबत हेमंत यशवंत भोसले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून निगडी पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. 831/2022 भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल आहे.

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस पथक करीत असताना गुन्ह्याचे ठिकाणी तसेच इतर वेगवेळ्या ठिकाणचे सी.सी. टिव्ही फुटेज चेक करत असताना दोन्ही कार घ्या नाशिकरोडने गेल्या असल्याचे त्यांना दिसुन आले होते. तपासपथकाने नाशिक हाथवे वरील सिसिटिव्ही फुटेज येवला, जिल्हा नाशिक पर्यन्त चेक केले त्यांना दोन्ही कारचे नंबर प्लेट बदली करुन राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे दिसुन आले. तसेच त्याच्या सोबत असणा-या आय टेन हया तिस-या गाडीचा नंबर मिळाला. सदरच्या नंबरवरुन मालकाचा नाव, पत्ता मिळवुन त्याबाबत तपास केला असता गाडी मालकाचे मोबाईल हा घटनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ठाणे शहर हद्दीत दिसुन आला तसेच त्या कारवर वाहतुक विभागाचे चलनही त्याच वेळी ठाणे शहर हद्दीत पडलेले असल्याचे दिसुन आले. फ़ोनचे दुस-या दिवशी सकाळचे लोकेशन हे येवला. नाशीक येथे दिसुन आले. यावरुन तपास पथकाला दोन्ही कारची चोरी त्याच कारचे मालकाने त्याच्या साथीदारासमवेत येवुन केलेली असावी असा संशय निर्माण झाला.

या बाबतीत खातरजमा करणेकामी वरीष्ठाचे परवानगीने गुन्हे शाखा युनिट 1 चे पो. हवा.बाळु कोकाटे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, सोमनाथ बोराडे, प्रमोद हिरळकर असे पोलीस पथक सांचौर, जि. जालोर, राजस्थान येथे पाठविले होते. पथकाने तेथे जावुन सलग 4 दिवस तेथे राहुन आरोपी बाबत गोपणीय माहिती काढली आरोपी नामे रमेश प्रभुराम विष्णोई, वय 24 वर्षे, राज्य राजस्थान यांस सांचौर, जि. जालोर हा स्थानिक पोलीस स्टेशन मधिल रेकार्डवरील गुन्हेगार असुन त्याचे साथीदार हे अक्रिम तस्करीमध्ये पाहिजे आरोपी आहेत. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले आरोपी असल्याने तपास पथकाने गोपनीय पदधतीने पाळत ठेवुन आरोपी रमेश प्रभुराम विष्णोई यास सांचोर, जिल्हा जालोर, राजस्थान येथील मार्केट मध्ये मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याचे ईतर साथीदार पळुन गेले. आरोपीकडे सखोल तपास करता त्याने त्याचा मित्र सुरेश वाघाराम, रा. बाडमेर, राजस्थान याच्या मदतीने सदरच्या दोन्ही कार चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी चोरलेल्या हृदांई आय-20 व क्रेटा अशा दोन्ही गाड्या किंमत 20 लाख हया त्याचे मुळ गावातून हस्तगत करण्यात आलेला आहे.

तपासात पाहिजे आरोपी सरेश वाडाराम, रा. बाडमेर, राजस्थान हा एनडीपीएस गुन्हयामध्ये राजस्थान पोलीसांना पाहिजे असणारा आरोपी असुन तो करत असलेल्या हमिम तष्करीसाठी त्याने सदरच्या गाडया चोरल्या असल्याचे अटक आरोपी सांगत आहे. क्रेटा तसेच आय-20 सारख्या महागड्या गाड्या चोरुन त्याचे नंबर तसेच इंजीन नंबर बदलुन त्या अफिम तस्करीसाठी पाहिजे असणारा आरोपी करत असल्याचे अटक आरोपी सांगत आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असुन त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत. अशा प्रकाराने पोलीसांनी तात्काळ कारवाई केल्यामुळे सदरच्या दोन्ही कारची विल्हेवाट लावण्यापुर्वीच मुळ स्थितीत गाड्या मिळविण्यात पोलीसांना यश प्राप्त झालेले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगर सेवक श्री. अमित गावडे, तुषार हिंगे व प्रशांत बाबर यांनी समक्ष गुन्हे शाखेत येवुन पोलीसाचे कामगिरीबाबत शाल-श्रीफळ देवून अभिनंदन केले..

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, मनोजकुमार कमले, प्रमोद हिरळकर यांचे पथकाने केली आहे. तपासकामात तात्रीक शाखेचे पो.ह. प्रशांत माळी यांनी विशेष सहकार्य केलेले आहे.

Exit mobile version