पुण्यातील सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामगाराची सुरू आहे आर्थिक लूट..!!

सामाजिक कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ अधिकारी यांच्या चौकशीची मागणी..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे महानगरपालिकाच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय मधील आरोग्य विभागमधील कोठ्या मध्ये ज्या सफाई सेवकांची कंत्राटी पध्दतीने जी भरती करण्यात आलेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधाकर गायकवाड यांनी केला आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी सफाई सेवकांची भरती करण्यासाठी प्रत्येकी 70,000 रुपये घेतल्याचे श्री. गायकवाड यांच्या निदर्शनास आले, तर कर्मचारी कामावर न जाता बोगस पध्दतीने पगार काढला जात आहे व त्यांच्याच पगारातून त्या काम करणार्या सेवकांना नाममात्र पगार दिला जात असल्याचे पुरावा सहीत माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री. गायकवाड यांनी पुणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त व सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त यांच्या कडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन सिंहगड रोड कार्यालयातील आरोग्य विभागातील सुरु असलेल्या भ्रष्टाचार विरोधात आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मुकादम आणि ठेकेदार यांच्या चौकशीची मागणी करून कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

प्रसार माध्यमांना माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते श्री. गायकवाड यांनी माहिती दिली की,फक्त सिंहगड क्षेत्रीय कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तर संपूर्ण पुणे महानगरपालिकातील उरलेल्या 14 ही क्षेत्रीय कार्यालय मध्ये अश्या प्रकारचा भ्रष्टाचार सुरू असल्याची दाट शक्यता आहे यातील काही सफाई सेवक कोणाच्या मर्जी राखण्यासाठी लागलेले आहेत, काही VIP सफाई सेवक घरी बसून पगार घेत आहेत, तर काही फक्त हजेरी पुरते कामावर जात आहेत, तर काही प्रामाणिक कष्ट करून ही त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला ह्या भ्रष्टाचारमुळे दिला जात नाही.

Exit mobile version