पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या १४ गुन्हेगारांना केले हद्दपार..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री.रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करून संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत.

पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशिर शस्त्रजवळ बाळगणे, अवैध जुगार चालविणे, अवैध दारुविक्री करणे व अंमली पदार्थ विक्री करणारे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकार्ड वरील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा म्हणुन संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप आयुक्त, परि- ४ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पुर्ण करुन १४ गुन्हेगाराविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडीपार आदेश केलेले आहेत. तडीपार करण्यात आलेल्या आरोपी मध्ये

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील 

१) मनोज भगवान कांबळे, वय ४८ वर्षे, २) ईस्माईल रियाज शेख वय २२ वर्षे, ३) देवीबाई रमेश राठोड, वय ४५ वर्षे, ४) सुमन मोहन नाईक वय ५० वर्षे , ५) भारती कृष्णा चव्हाण वय ३२ वर्षे ,६) कमल राजु चव्हाण वय ५० वर्षे, ७) लक्ष्मी गोपाळ पवार वय ४६ वर्षे,८) मोहित ऊर्फ बिटया संजय सुर्यवंशी वय २३ वर्षे,

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील 

९ ) सुरज ऊर्फ गुंडया मनोहर माचरेकर वय ४० वर्ष, १०) दिलीप गोविंद सुर्यवंशी वय ३१ वर्षे, ११) विवेक चंद्रकांत चव्हाण वय २७ वर्षे,

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील 

१२ ) गौरव दिपक मिसाळ वय २१ वर्षे,

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील 

१३ ) नगनाथ संभाजी गिरी वय १९ वर्षे,

चतुश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील 

१४ ) जावेद जानशा शेख वय ५३ वर्षे यांचा समावेश आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री रंजनकुमार शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. या पुढील काळात देखील पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -४ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतीबंधक कारवाई करुन गुन्हेगारीस प्रतिबंधक करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Exit mobile version