पुणे महानगरपालिकेकडील कनिष्ठ अभियंता, स्थापत्य कागदपत्रा मध्ये गोलमाल बंद होईल का ?

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे महानगरपालिकेकडील अभियांत्रिकी शाखेचे कागदपत्रे तपासणी सुरू असताना, अनेक उमेदवार यांनी वैयक्तीक पातळीवर प्रशासनाकडे बनावट कागदपत्रे सादर केली होती. त्यामध्ये पुणे महानगरपालिकानी 3 कनिष्ठ अभियंता यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली होती.

बनावट कागदपत्रांच्या तक्रारी

अभियांत्रिकी शाखेचे कागदपत्र तपासणी सुरू होत असताना अनेक उमेदवारांनी वैयक्तीक पातळीवर प्रशासनाकडे बनावट कागदपत्र तपासणीसाठी सादर केले जात असल्याची तक्रार केली होत्या. यामध्ये काही विद्यार्थी पदवी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी तीन वर्षांचा अनुभव दाखवला आहे. तसेच माजी सैनिक या आरक्षीत पदासाठी ४५ वर्षांची अट असताना काही जण त्यापेक्षा कमी वयाचे असल्याचेही समोर येत होते. तसेच अनुभव प्रमाणपत्रासाठी काही ठेकेदार किंवा बांधकाम व्यावसायिकाकडे काम केल्याचे खोटे अनुभव प्रमाणपत्र तयार केलेले होते.

यापुढे पुणे महानगरपालिकांनी कागदपत्रे तपासताना योग्य ती दक्षता घेतली पाहिजे, यामध्ये फॉर्म 16,बँक स्टेटमेंट, पे स्लिप, अनुभव प्रमाणपत्र, पीफ क्रमांक या सर्व बाबी योग्य रित्या तपासणी केली तर भविष्यात त्याचा दुषपरिणाम दुसऱ्या उमेदवार वर होणार नाही, माजी सैनिक यांच्या जागा रिक्त ठेवण्यात याव्यात याकडे महानगरपालिकेने विषेश लक्ष देण्याची गरज आहे.

आता सुध्दा पुणे महानगरपालिकांनी यांच्या कडे कनिष्ठ अभियंता यांची प्रतिक्षा यादी आहे, त्यामध्ये सर्व उमेदवार यांची कागदपत्रे तपासून घ्यावी, यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत.अतिरिक्त प्राधिकरण अधिकारी यांची कागदपत्रे तपासणीसाठी नेमणूक करण्यात यावी, आणि असे बनावट कागदपत्रे देणारे उमेदवार निवडले जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली पाहिजेत हि पुणेकरांची अपेक्षा आहे.

Exit mobile version