पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष बाल पोलीस अधिका-यांचा गौरव व टास्क फोर्स अंतर्गत केली वाहनाची सुविधा..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पोलीस स्टेशन स्तरावर विधीसंघर्षग्रस्त बालक किंवा पिडीत बालक आले नंतर पुढील कायदेशीर कारवाई करुन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय तसेच मा.बालन्याय मंडळ, येरवडा, पुणे किंवा मा.बालकल्याण समिती, येरवडा, पुणे यांचे समक्ष हजर केले जाते. पिडीत (काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालके) बालकांना बाल कल्याण समिती समक्ष हजर केले नंतर संबंधित बालकांना बालगृहात ठेवले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये बालकांना पोलीस स्टेशनकडुन घेवून संबंधित यंत्रणेकडे जाणेसाठी त्याचप्रमाणे, बाल भिक्षेकरी कारवाई करण्यासाठी व ताब्यात घेतलेले बाल भिक्षेकरींना मा.बाल कल्याण समिती, येरवडा, पुणे येथे घेऊन जाण्यासाठी चारचाकी वाहनाची आवश्यकता असते.

यावर उपाययोजना म्हणून मा.पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांच्या मान्यतेने व होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. कॅरोलीन अॅडॉर यांच्या सहकार्याने निडर प्रकल्प अंतर्गत टास्क फोर्स उपक्रमात आणखी एक चारचाकी वाहन (नेक्सा एक्सेल ६), ड्रायव्हर व त्यांचेशी संपर्क करण्यासाठी संपर्क अधिकारी असे उपलब्ध करून दिले आहे. हि वाहतूक सेवा पुणे शहर पोलीस दलासाठी विना शुल्क २४ तास उपलब्ध करुन दिली आहे. या वाहनाची देखभाल व नियंत्रण संस्थेमार्फत केली जाणार आहे. यापूर्वीही या कामकाजासाठी संस्थेने क्रुझर वाहन उपलब्ध करुन दिलेले आहे.

तसेच, परिमंडळ-०२ मधील सर्व विशेष बाल पोलीस अधिकारी यांना होप फॉर दी चिल्ड्रेनच्या मदतीने लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. तसेच २०२२ मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयात उत्कृष्टरित्या काम करणारे अधिकारी १. मसपोनि. अर्चना कटके, विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल, २. मसपोनि.प्रेमा पाटील,तत्कालीन नेम. खडकी पोलीस ठाणे, ३. मपोउपनि शुभांगी मगदुम, विश्रांतवाडी पोलीस ठाणे, ४. मपोउपनि. अश्विनी भोसले, मुंढवा पोलीस ठाणे, ५ मपोउपनि. दिपाली लुगडे, उत्तमनगर पोलीस ठाणे यांचा मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच सर्व पोलीस ठाणेचे विशेष बाल पोलीस अधिकारी (CWPO) यांना बाल स्नेही पोलीस जॅकेटचे वाटप करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता सर, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर, मा. पोलीस उप आयुक्त श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२ डॉ. नारायण शिरगावकर, होप फॉर चिल्ड्रेन या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती. कॅरोलीन अॅडवा, डी. वॉल्टर, व्यवस्थापक श्री. शकील शेख, टास्कफोर्स बालस्नेही कृती दल चे समन्वयक, वसीम शेख, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. महराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या- अॅड. जयश्री पालवे, जीस्टॅम्प कंपनीच्या एच. आर. श्रीमती निर्मला जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे, तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनला नेमणूकीस असलेले विशेष बाल पोलीस अधिकारी व इतर मान्यवर तसेच पोलीस निरीक्षक, श्री. सुनिल जाधव, भरोसा सेल, गुन्हेशाखा पुणे शहर, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना कटके विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल व सर्व स्टाफ विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल, पुणे शहर कार्यक्रमास उपस्थित होते.

Exit mobile version