पिस्टलचा धाक दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह स्वारगेट पोलीसांनी केले अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- अंडाभुर्जीचे गाडीवर तोंड ओळखीचा असलेला बंडया थोरवे याने त्यांचे स्वारगेट एसटी स्टॅन्ड समोरील अंडाभुर्जीचे हातगाडीवर येवुन त्यांना फुकट अंडा राईस मागितला व तो देण्यास अंडाभुर्जी गाडी चालक यांनी नकार दिला म्हणुन थोरवे याने त्याचे जवळ असलेल्या पिस्तुलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली व जबरदस्तीने अंडाभुर्जीच्या गाडीपासुन बाजुला ढकलुन देऊन गल्ल्यामधुन एकुण २६३०/- रुपये रोख रक्कम घेवून पळुन गेल्याने फिर्यादी यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि.नं. २६९/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३७ प्रमाणे गुन्हा नोंद केला होता .

दाखल गुन्हयातील आरोपी बंडया थोरवे हा स्वारगेट येथील गुलटेकडी कॅनॉलजवळ आला आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे व अनिस शेख यांना मिळाली मिळालेली बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अशोक इंदलकर यांना कळविलेनंतर स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रशांत संदे यांना बोलावुन आरोपीस जेरबंद करण्यासाठी व कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

त्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे व तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, पो/अं अनिस शेख, पो/ हअं किरण भरगुडे व पो/अं चव्हाण यांचेसह बातमीचे ठिकाणी रवाना होवुन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबले. बातमीच्या ठिकाणी बंडया थोरवे हा पायी चालत येत असल्याचे दिसुन आले तर सपोनि प्रशांत संदे यांनी त्यास बंडया म्हणुन आवाज दिला असता तो त्यांना पाहुन पळुन जावु लागल्याने पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन बंडया ऊर्फ काळुराम प्रशांत थोरवे, वय ३० वर्षे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने दाखल गुन्हयात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे तसेच चोरी केलेली रोख रक्कम असा एकुण २७,०१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याने यापुर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत तपास चालु आहे.

सदरची कामगिरी ही मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोहवा मुकुंद तारु तसेच पोलीस अंमलदार, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, किरण भरगुडे, रमेश चव्हाण, फिरोज शेख, दिपक खेंदाड, शिवा गायकवाड, प्रविण गोडसे, यांनी एकत्रीतपणे केली आहे.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

Exit mobile version