पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे तब्बल १,४६,९३,७०५/- किंमतीचा मुद्देमाल मुळमालकांना केला परत..!!

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्ताने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे किंमती मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- संपुर्ण महाराष्ट्र पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधुन मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे यांचे संकल्पनेतुन मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला. सदर समारंभात एकुण ८४ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील ८४ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला.

या कार्यक्रमात संपुर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकुण ८४ गुन्ह्यांतील एकुण ६७९ ग्रॅम ५९० मि. ग्रॅ. वजनाचे सोन्याचे दागिने व ७३९ ग्रॅम चांदीचे दागिने एकुण किंमत रु.३३,४३,२४०/- तसेच एकुण १५ मोबाईल फोन, किंमत रु.२,४८,०००/-, १ लॅपटॉप किंमत रु.२०,०००/-, चार चाकी व दुचाकी वाहने एकुण २१ वाहने किंमत रु.५१,५०,०००/-, ६ अॅटो रिक्षा किंमत रु.६,७०,०००/-, ब्रिजस्टोन कंपनीचे टायर व ट्युब असा मुद्देमाल किंमत रु.३७,५७,७६५/- व इतर मुद्देमाल किंमत रु.२,२१,१००/- असा एकुण रक्कम रु. १,४६,९३,७०५/- (एक कोटी सेहचाळीस लाख त्र्यान्नव हजार सातशे पाच रुपये ) किंमतीचा मुद्देमाल संबंधित मुळ मालकांना मा. पोलीस आयुक्त साो. यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मा. पोलीस आयुक्त सो.यांनी सांगितले की, गुन्हयातील चोरीस गेलेला मुददेमाल हस्तगत करताना पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मध्ये तपास करुन आरोपीस अटक करुन त्याचेकडुन मुददेमाल हस्तगत करावा लागतो. अशा प्रसंगी परराज्यामध्ये पोलीसांना अत्यंत कठीन प्रसंगांचा सामना करावा लागतो. तरी सुध्दा आपले पोलीस अधिकारी व अंमलदार हे प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आरोपी व त्याच्या साथीदारांकडुन मुददेमाल हस्तगत करुन आणतात. अशा सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे तसेच गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांचे त्यांनी कौतुक करुन अभिनंदन केले. त्याचप्रमाणे ज्या फिर्यादिंचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, त्यांचेसुदधा अभिनंदन करुन कौतुक केले. तसेच जनतेनेसुदधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे. तसेच पोलीसांना सहकार्य करावे. पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत असे सांगितले. याप्रसंगी ज्यांना आपला मुद्देमाल परत मिळाला अशा काही फिर्यादींनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- १ यांनी केले तसेच सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक, पीसीबी गुन्हे शाखा यांनी केले.

तर सदर कार्यक्रम प्रसंगी श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड व श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, श्री. विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, श्री. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, हे उपस्थित होते.

Exit mobile version