पत्रकारास धक्काबुक्की करणे पडले महाग, Journalist Protection Act; पत्रकार संरक्षण कायदा नुसार गुन्हा दाखल

सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात – स्वाभीमानी मराठी पत्रकार संघाची मागणी

बार्शी दि. २१ निर्भीड वर्तमान:- जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केलेप्रकरणी एकावर Journalist Protection Act;पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा सर्व प्रकार बार्शी येथे घडला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण;

या प्रकरणातील तक्रारदार पत्रकार धिरज आगतराव शेळके हे बार्शी तालुक्यातील असुन गेले पाच वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातिल प्रश्न जगासमोर मांडत आहेत. त्यांचा कामाचा एक भाग म्हणून दि. 05/01/2024 रोजी बार्शी येथे कार्यरत असलेल्या उमेद अभियाना अंतर्गत काम करणारे महीलांचे मानधन न मिळाल्याने त्या महीला पंचायत समिती बार्शी या ठिकाणी उपोषण करण्याकरिता  बसल्या होत्या. या उपोशणाबाबतची हिंदवी समाचार न्युज चॅनेलने बातमी प्रसारित केली होती. तर उपोषणाची बातमी पाहुन बीडीओ पंचायत समिती बार्शी यांनी तात्काळ तोंडी आश्वासन दिले होते की, संबधित संस्थेच्या अधिकारी यांना बोलावुन विषय मार्गी लावतो.

पुढे दि. 17/01/2024 रोजी संबधित स्वयंम शिक्षण प्रयोग याचे प्रोजेक्ट मॅनेंजर किरण माने यांना व उमेद अभियान मध्ये काम करणारे मानधन न मिळालेले महीलाना चर्चा करण्यासाठी उमेद अभियानाचे शिवाजी आखाडा बार्शी येथील बीएसएनएस चे बिल्डींग मधील आफिस मध्ये दुपारी बोलावुन घेतले होते. या मीटिंगच्या ठिकाणी पत्रकार वार्तांकन करून महीलांची व प्रोजेक्ट मॅनेंजर यांची प्रतिक्रिया घेत असताना स्वयंम शिक्षण प्रयोग धाराशिव संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेंजर किरण माने यांना पत्रकार यांनी उपोशणकत्त्या महीलांचे मानधन काढले का नाही व काढले असेल तर ते कोणत्या आधारावर काढले याबाबत विचारणा केली त्यावर माने यांनी मला भुक लागली आहे मला जेवायला जायचे आहे.असे उत्तर देऊन विषय टाळण्याचा ते प्रयत्न करत होते यामुळे प्रोजेक्ट मॅनेंजर यांना हया महीला पण सकाळपासुन येथे उपाषी बसलेल्या आहेत त्यांना पण जेवायला जायचे आहे असे सांगितले असता प्रोजेक्ट मॅनेंजर यांचा भलताच पारा वर गेला व त्यांनी शुटिंग काढत असलेला मोबाईल हिसकावुन घेण्याचा प्रयत्न करून धक्काबुक्की व शिवीगाळी करून तुला कुठे गुन्हा दाखल करायचे आहे ते कर तुला बघुन घेईन असे म्हणुन धमकी देवुन ते तेथून निघुन गेले होते.

स्वाभीमानी मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे यांनी पत्रकार धिरज शेळके यांच्या सोबत दूरध्वनीद्वारे संवाद साधला असून प्रकरणाची माहिती घेतली आहे व पत्रकार संघ शेळके यांच्या सोबत असून भविषयात पत्रकारिता करत असताना व दाखल केलेल्या गुन्ह्या मध्ये कोणताही प्रकारची दिरंगाई किंवा दबाव येत असेल तर स्वाभीमानी मराठी पत्रकार संघ शांत बसणार नाही असे आश्वासित केले आहे. तर बार्शी पोलिस स्टेशन यांच्याशीही याप्रकरांची चर्चा केली आहे.

पत्रकारांवर वाढत असलेले हल्ले हे पत्रकारांसोबत समजासाठीही तेवढेच घातक आहे. पत्रकारांना आपले काम करण्यासाठी मोकळे वातावरणाचा अभाव झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे हे कधीही सहन केले जाणार नाहीत असे मत दारोळे यांनी व्यक्त केले आहे.

नेहमी शांत असलेला व 24 तास समाजाप्रति आपल्या नैतीक जबाबदारीचे भान ठेऊन आपले योगदान पत्रकार देत असतो पत्रकार हा समाजाचा आरसा असून व चौथा आधारस्तंभ असतो त्याला जर आपल्या कामामध्ये दबाव किंवा गुंडशाहीचे प्रकार वाढत असतील ही बाब पत्रकारांसोबत आपल्या समाजसाठी घातक आहे.

2017 साली अस्तित्वात आलेल्या Journalist Protection Act पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे अशा सर्व प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी नुसते कागदावर नाही तर पत्रकार संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत, पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेच्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा त्यांना धमकी देणाऱ्या, हल्ले करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होऊ शकते. या कायद्याचा वापर करून पत्रकारांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. सरकारने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे यांनी या निम्मीताने पुनः केली आहे

Exit mobile version