नोकरीचे आमिष दाखुन लाखांचा घालत होते गंडा, पुण्यासह अमरावती मधून आरोपींना ठोकल्या बेड्या…!!

वर्तमान टाइम्स वृत्तसेवा :- नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोबाईल वर मेसेज पाठवुन, जॉब देतो असे सांगुन पैसे गुंतवणुक करण्यास भाग पाडले व् एकुण ११,४३,४५५/- रु आर्थिक फसवणुक केली होती. मुंबई दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीसांनी मोठ्या शिताफीने आरोपिना पुणे व अमरावती येथून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर तक्रारदार हे ऑनलाईन जॉब शोधत असताना त्यांनी त्यांचा बायोडाटा Nokari.com व Linkedin या अॅपवर बायोडाटा अपलोड केला होता आरोपी यांनी तक्रारदार यांना वेगवेगळे You Tube Channel Subscribe करण्यास सांगुन सुरवातीला त्याचा मोबदला दिला व त्यानंतर पैसे गुंतवणुक करण्यास सांगुन त्याकरीता फिर्यादी यांना त्यांचे टेलिग्राम वर एक https://t.me/Mukta12 अशी बिझनेस मॅटर बाबत लिंक पाठवुन गुंतवणुकीकरीताची https://cryptosg.net लिंक पाठवुन त्यावर रजिस्टेशन करण्यास सांगुन पैशांची गुंतवणुक करण्यास सांगितले सुरवातीला मोबदला देखिल दिला पण त्यानंतर
मोठया प्रमाणात रक्कम जमा झालेवर फिर्यादी यांना पोलिसांनी त्यांचे गुंतवणुकीचे खाते गोठविले असलेबाबत खोटे सांगुन मुंबई पोलिसांचा लोगो असलेले बनावट प्रमाणपत्र फिर्यादी यांना पाठविले व खात्यावरील रक्कम काढण्यासाठी मोठया रकमेची मागणी केली. अशाप्रकारे फिर्यादी यांना जास्त मोबदल्याचे अमिष दाखवून वेळोवेळी रक्कम जमा करण्यास भाग पाडुन एकुण ११,४३,४५५/- रु ची फसवणुक केली होती.

या प्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने फिर्यादी यांचे सविस्तर जबाबावरुन गुन्हा नोंद केला होता. गुन्हयाचे प्राप्त तपशीलाचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयात पुणे येथुन आरोपी १) बिंदुसार गबाजी शेलार, वय ४० वर्षे, २) महेश माणिक राउत, वय २४, ३) योगेश सुरेश खवले, वय- २८ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अमरावती येथुन आरोपी ४) अक्षय एकनाथ खडसे, वय २७वर्षे, ५) अमित अजयसिंह तवर उर्फ बाला यांना अटक करण्यात आले आहे. आरोपीचे बँक खात्यात एकुण २,७२,३४८/- रुपये इतकी रक्कम गोठविण्यात आलेली आहे. तर गुन्हयात अशी एकुण ३,०१,३४८/- रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. बाळसिंग राजपुत (सायबर गुन्हे), मा. सहा. पोलीस आयुक्त रामचंद्र लोटलीकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे, पोलीस निरीक्षक समिर लोणकर, पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी, पो.ह. लहारे, पो. खान, पो.ह वरठे, पो.ना गलांडे, पोशि धोत्रे, मपोशि धुमाळ यांनी केली आहे.

Exit mobile version