नाकाबंदी कारवाईत मिळाले आंतरराज्यीय चोरट्यासह ५०,३४,२५३/- लाखाचे घबाड..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- वरळी पोलीस ठाणे येथील रात्रपाळीचे पो. नि. दोरकर, पोलीस शिपाई गवळी, पोलीस हवा. पाटणे, पोलीस हवा.फडतरे हे जीजामाता नगर येथे गुन्हे प्रतिबंधाकरीता नाकाबंदी कारवाई करत होते, कारवाई करीत असताना रात्री २१.५५ वाजता एक व्यक्ती नंबरप्लेट नसलेली विनाहेल्मेट ॲक्टीवा मोटर स्कुटर चालवत असताना आढळून आला व गणवेशधारी पोलीसांना बघून पोलीसांची नजर चुकवून पळुन जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाला संशय निर्माण झाल्याने त्यास अडवून वाहन चालकाचा परवाना व इतर कागदपत्रे याबाबात विचारणा करण्यात आली, तर त्याने वाहन परवाना काढले नसलेबाबत सांगितले, वाहनास नंबर प्लेट का नाही? तसेच हेल्मेट का परीधान केले नाही? याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊन निघुन जाण्याच्या बेतात होता म्हणुन पोलीस पथकाने त्याला मोटार सायकल सह ताब्यात घेऊन वरळी पोलीस ठाणे येथे आणले व पोलीस ठाण्यामध्ये सखोल चौकशी केली व त्याची अंगझडती व मोटार सायकलची झडती दोन पंचासमक्ष घेतली असता त्याच्याकडे अंगझडतीत व मोटार सायकलच्या डिक्कीत खालील वर्णनाचे सोन्या व चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून आले आहे.

०१) सोन्याचे मंगळसुत्र १० नग एकुण वजन १५५.१ ग्रॅम, किमत ८ लाख ९९ हजार ६३० रूपये

०२) सोन्याचे नेकलेस ४ नग, एकुण वजन ९८.४ ग्रॅम किंमत ५,७०,७२० /- रूपये

०३) सोन्याची चैन १० नग, एकुण वनज ९० ग्रॅम किंमत ४,५९,६३० /- रूपये

०४) सोन्याचे ब्रेसलेट ४ नग, एकुण वजन ५३.२ ग्रॅम, किंमत ३,०८, ५६० /- रूपये

०५) सोन्याचे लेडीज कडे, ४ नग, एकुण वजन ९४.४ ग्रॅम, किंमत २,७३,०००/- रूपये ५.७१.८२८/- रूपये

०६) सोन्याचे लेडीज बांगडया, ६ नग, एकुण वनज ७८.७ ग्रॅम, किंमत ४,५६,४६० /- रूपये

०७) सोन्याच्या अंगठया, १४ नग, एकुण वजन ४६.१ ग्रॅम, किंमत ३,८७,४४०/- रूपये

०८) सोन्याचे कानातील कर्नकुले (जोड), २३ नग, एकुण वजन ९५.६ ग्रॅम, एकुण वनज

०९) दोन लेडीज टिक्का, २ नग, एकुण वजन ८.५०० ग्रॅम, किंमत ४९,३००/- रूपये

१०) सोन्याचे पेंडंट, ५ नग, एकुण वजन २३.९०० ग्रॅम, किंमत २४,८९५ /- रूपये

११) बांगडी ४ नग, एकुण वजन ९८.६ ग्रॅम, किंमत २,४९,४००/- रूपये

१२) एक सोन्याची तार, एकुण वजन ५.२०० ग्रॅम, किंमत ३०,१६० रूपये

१३) एक सोन्याची नथ, एकुण वजन ०.८०० ग्रॅम, किंमत ४,६४० /- रूपये

१४) एक सोन्याची नथ, एकुण वजन १.२ ग्रॅम, किंमत ६,९६०/- रूपये

१५) पांढऱ्या रंगाचे चांदीचे एक कानातील बाळी, दोन जोडवी, दोन नथ, एक अंगठी, एक पैंजन तुकडा, एकुण वजन १२ ग्रॅम, किंमत १०२० /- रूपये

१६) एक पांढ-या रंगाचा मोती हार एकुण वनज १६.६०० ग्रॅम किमतं १,७०० / रुपये

१७) रॅडो कंपनीचे लेडीज घडयाळ किमत ५०,०००/ रुपये

१८) ४ पेनड्राईव्ह किंमत २५००/- रूपये

१९) एक काळया रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीवा क्र. ळश्र २७ का ५१०८ए किमत ५०,०००/- रूपये

२०) रोख रक्कम ७,४६, ४३० /- रूपये

एकुण किंमत:- ५०,३४,२५३/-

अशी वरील वर्णनाची व एकुण किमतीची व मोटार सायकल तुटलेली नंबर प्लेट क्र. जी. जे. २७ डी. जे. – ५१०८ मिळाली आली. आरोपीकडे मिळालेला मोबाईल मधील कॉल लॉग चेक केला व सतत आलेल्या मिस कॉलवर कॉल केला तेव्हा सदर मोबाईल अजमेर, राजस्थान येथे चोरीस गेलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे ताब्यातील व्यक्तीची सखोल चौकशी केली असता त्याने वरळीसह इतर ठिकाणीही चोरी केलेबाबत सांगीतले म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे वरळी पोलीस ठाणे गु.र.क्र. ११०/२०२३ कलम ३७९ भा. द. वि. १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक दोरकर करीत आहेत.

गुन्हयातील आरोपी हा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर खालीप्रमाणे किमान गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे.

१) सी डिव्हिजन पोलीस ठाणे, भरूच सिटी :- गु.र.क्र.१११९९००१२०००२८ / २०२३ कलम ३८०, ४५४, भादवि.

२) समा पोलीस ठाणे, बरोडा सिटी :- गु.र.क्र.१११९६०१३२३००२० / २०२३ कलम ३८० भा.द.वि.

३) रामोल पोलीस ठाणे, अहमदाबाद, गुजरात:- वरळी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील आरोपीच्या ताब्यात मिळालेली अॅक्टीव्हा मोटार सायकल क्र. जी.जे. २७ डी.जे. – ५१०८ ही मोटार सायकल गुजरात राज्यातील रामोल पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक ०६/०२/२०२३ रोजी १२.३० वा. यातील नमूद आरोपीताने चोरी केलेबाबत तक्रारी अर्ज मोटार सायकल मालकाने दिला असून त्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.

४) आझाद नगर पोलीस ठाणे, मालेगाव, जिल्हा नाशिक:- नमूद गुन्हयातील आरोपीच्या अंगझडतीत मिळालेला मोबाईल फोन मालकाचा शोध घेतला असून त्यांचा मोबाईल फोन अजमेर राज्य राजस्थान येथे चोरीस गेला होता. त्याबाबत त्यांनी आझाद नगर पोलीस ठाणे, मालेगाव, जिल्हा नाशिक येथे मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे त्याबाबत पुढील तपास चालू आहे.

उर्वरीत मालमत्ता कोठे चोरली, मुंबईमध्ये येण्याचे कारण इत्यादीबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. सह पोलीस आयुक्त, (का. व सु.) श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग श्री. अनिल कुंभारे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री अकबर पठाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, वरळी विभाग श्रीनिवास पन्हाळे, तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वरळी पोलीस ठाणे, मुंबई श्री अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर, पोलीस हवालदार. पाटणे, पोलीस हवालदार. फडतरे, पोलीस शिपाई गवळी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Exit mobile version