नवीन घर घेण्याच्या प्रयत्नात केलेली कोंढव्यातील धाडसी घरफोडी उघड, लाखोंचा माल जप्त..!!

एकुण ३७,३०,२००/-रु.कि.चा ६५.५ तोळे (६५५ ग्रॅम) १००% मुद्देमाल हस्तगत..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- कोंढवा पोलीस ठाणे गुरनं. १२७२ /२०२२, भादविक ४५७, ३८० अन्वये दाखल झालेल्या गुन्हयाचे घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. या नमुद गुन्हयाचा समांतर तपास मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार यांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ करीत होती.

गुन्हयाचा तपास करत असताना कोंढवा परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. तसेच घटनास्थळाचे दिशेने येणा-या-जाणा-या सर्व व्यक्ती व त्यांची वाहने तपासण्यात आली. वाहनाचा तपास करीत असताना एक संशईत ज्युपीटर गाडीवर एक इसम जात असताना आढळुन आला. गुन्हे शाखेच्या युनिट-५ कडील अधिकारी व अंमलदार यांनी त्या गाडी ज्या दिशेनी आली आणि परत गेली तो संपुर्ण रुट काढला,त्या ज्युपीटर गाडीवर असलेल्या विशिष्ट स्टीकरवरुन माहिती पोलीसांनी प्राप्त केली ती गाडी रेकॉर्डवरील आरोपी मल्लप्पा साहेबान्ना होसमानी, वय – ३१, हा वापरत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलीसांनी आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी पडताळुन पाहली, त्याचेवर यापुर्वी वाहन चोरीचे गुन्हे अनुक्रमे लोणीकाळभोर, चंदननगर आणि हिंजवडी पोलीस ठाणे येथे नोंद असल्याचे आढळुन आले. यानंतर गुन्हे शाखा युनिट-५ पथकाचा मल्लप्पा साहेबान्ना होसमानी याच्यावर संशय अधिक बळावला. मल्लप्पा होसमानी याला ताब्यात घेणेकामी कात्रज भागामध्ये पोलीस निरीक्षक उल्हास कदम व पथक यांनी सापळा लावुन त्याला ताब्यात घेण्यात आले.

युनिट कार्यालयात आणुन त्याचेकडे सखोल व कौशल्यपूर्वक तपास केला त्याने कोंढव्यातील घरफोडी केल्याचे कबुल केले.व आरोपीकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने चोरी करुन आलेल्या पैशात घर घेऊन दुसरीकडे राहण्याचा त्याचा प्लॅन असल्याचे त्याने तपासामध्ये सांगितले. गुन्हयाचे तपासात अटक आरोपी यांच्याकडुन पोलीसांनी सोन्याचे व हि-याचे दागिने असा एकुण ३७,३०,२००/-रु.कि.चा ६५.५ तोळे (६५५ ग्रॅम) १०० टक्के असा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणुन गुन्हे शाखा युनिट-५ ने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, गुन्हे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५कडील पोलीस निरीक्षक, श्री. उल्हास – कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटे, शशिकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, अकबर शेख, अमित कांबळे, स्वाती गावडे, तृप्ती झगडे व संजयकुमार दळवी यांनी कामगिरी केली आहे.

Exit mobile version