धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत नोंदणी संदर्भात जनजागृती

नागपुर, निर्भीड वर्तमान:- पुण्याचे कर-सवलत विभागाचे आयकर आयुक्त अभिनय कुंभार आणि नागपूरचे आयकर सहआयुक्त डॉ. भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झ्म्पशन रेंज, प्राप्तिकर विभागा तर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणी संदर्भात एक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज 26 जून बुधवार रोजी दुपारी 4 ते 5.30 पर्यंत चाणक्य सभागृह, आयकर भवन सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता तसंच धर्मादाय संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील अलीकडील बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे.

सनदी लेखापाल प्रणव अष्टेकर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते असतील. सर्व विश्वस्त,कर्मचारी, प्राप्तिकर अभ्यासक आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी मोठ्या संख्येनं  उपस्थित राहावं असं आवाहन आयकर विभागा व्दारे करण्यात आले आहे.

Exit mobile version