दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार सिहंगड रोड पोलीसांकडुन जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दि. २०/१२/२०२२ रोजी सिंहगड पो स्टे ५३८ / २०२२, भादविक ३९५, ३६४ (अ), ३८५, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयाचे अनुशंगाने सिहंगड रोड कडील रात्रगस्त अधिकारी सपोनिरी.राहुल यादव व डी. बी. पथक हे तात्काळ नवले ब्रीज येथे पोहचुन तक्रारदारची भेट घेतली व त्यांचेकडुन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार सहा.पो.फौ. कुरळे, पो.हवा. साळुंके, पो. हवा. केकाण व डीबी पथकाचे सहा. फौज उतेकर व पोलीस अंमलदार, देवा चव्हाण यांचेसह तक्रारदार यांचे बरोबर जावुन कात्रज रोडवरील बी. पी. पेट्रोल पंपा समोर उभ्या असलेल्या दरोडेखोर यांच्या गाडीस पाठीमागुन व पुढील बाजुने गाडया आडव्या लावून अडवले, गाडीतील आरोपी पळून जाण्याचे प्रयत्न करीत असताना त्या तिन्ही आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले, त्याचवेळी पेट्रोल आणण्यास गेलेले दोघे आरोपी तेथे आले व ते पोलीसांना पाहुन पळुन जात असताना, पोलीस स्टाफने पाठलाग करुन, त्यापैकी एकास ताब्यात घेतले आहे व एक आरोपी फरार झाला आहे.त्याचा शोध सुरू आहे

ताब्यात घेण्यात आलेल्या 1) विनोद शिवाजी जामदारे वय ३२ वर्ष, २) रोहीत विकास शिनगारे, वय १९, ३) विशाल विठ्ठल रणदिवे, वय २२, ४) गौरव गंगाधर शिंदे, ५) नितीन सुरेश जागदंड, वय ३५ वर्षे, या आरोपीताना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन, गुन्हयाचा तपास सपोनि. दिपक कादबाने करीत आहेत.

तर अटक करण्यात आलेले आरोपीपैकी १) विनोद शिवाजी जामदारे याचे विरुध्द सिहंगड रोड, दत्तवाडी, वारजे माळवाडी येथे खुन, दरोडा, खंडणी यासारखे ०७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २) गौरव गंगाधर शिंदे याचे बार्शी पो.ठाणे येथे खुनाचा प्रयत्न यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. ३) नितीन सुरेश जोगदंड याचे विरुध्द दत्तवाडी पो. ठाणे येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेक्षिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप- आयुक्त, परि-३, सुहेल शर्मा, मा. सहा.पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे, सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), जयंत राजुरकर, सहा.पोलीस निरीक्षक,राहुल यादव, दिपक कादबाने, सहा.पो.फौज. कुरळे, उतेकर, पोलीस अंमलदार केकाण, अमित साळुकें, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर व राहुल ओलेकर यांनी केली आहे.

 

 

Exit mobile version