दत्तवाडी पोलीसांकडून जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली फसवणुक करणाऱ्यास हरियाणा येथून अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील व्हॉटसअॅप द्वारे Jiofiber.APK फाईल पाठवुन नेटबँकिंग युजरआयडीचा ॲक्सेस मिळवुन एकुण ५,००,६९८/- रुपयाची आर्थिक फसवणुक करणाऱ्या व्यक्तीला हरियाणा राज्यातुन अटक करण्यास सायबर तपास पथक दत्तवाडी पोलीस स्टेशन यांना यश आले आहे.

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीस जीओ फायबरचे कनेक्शन हे सवलतीच्या दरामध्ये देतो असे आमिष दाखवुन त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या नावाखाली नेटबँकिंग अकाऊंट माहिती मिळविण्यासाठी Jiofiber. APK फाईल व्हॉटसअॅप वर पाठवुन ती डाऊन लोड करावयास सांगितली अप्लीकेशन डाऊनलोड झाल्यानंतर त्या अॅप्लीकेशन द्वारे नेटबँकींग अकाऊंट युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करुन नेटबँकींगद्वारे अकाऊंट मधुन दि. ०९/०४/२०२३ रोजी पहाटे एकुण ५,००,६९८/-रुपये आरोपी यांनी काढुन घेतले होते. याबाबत दि. ०९/०४/२०२३ रोजी फिर्यादी यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता त्या अनुशंगाने दि. २०/०४/२०२३ रोजी आर्थिक फसवणुकी बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात सायबर तपास पथकाने आरोपीचे मोबाईल क्रमांक तसेच बेनिफिशरी बँक अकाऊंटची संबधित कंपनी कडुन माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे फसवणुकीची रक्कम ज्या खात्या मध्ये वळती झाली तो खातेधारक हा मु.पो. चिका, ता. गुहला जि. कैथल, राज्य हरियाणा येथील असल्याची माहिती प्राप्त करुन त्यास अटक करण्यासाठी सायबर तपास पथक हे तात्काळ हरियाणा येथे रवाना झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीस चिका पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी कडे दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने अधिक तपास चालु असुन त्याच्या सोबत काम करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी चालु आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री अभय महाजन, दत्तवाडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ श्री. सुहेलशर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त. सिंहगड रोड विभाग श्री. राजेंद्र गलांडे, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तवाडी पोस्टे श्री अभय महाजन, पोलीस निरिक्षक गुन्हे, दत्तवाडी पोस्टे श्री विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथकातील श्री. अक्षय सरवदे, पोलीस उप-निरिक्षक, पोना काशीनाथ कोळेकर, अंमलदार जगदिश खेडकर, अनुप पंडित प्रसाद पोतदार यांनी केली

Exit mobile version