दत्तनगर कात्रज परिसरात चालणा-या जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दत्तनगर कात्रज परिसरात बेकायदेशीर पणती पाकोळी सोरट जुगार धंदा चालु असलेबाबत गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी यांना आपल्या बातमीदारामार्फत कळाली होती.

प्राप्त झालेल्या माहितीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे, शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बेकायदेशीर पणे पणती पाकोळी सोरट जुगार चालु असल्याचे खात्री केल्यानंतर तात्काळ छापा कारवाई करुन ६,९८०/- रु. रोख व जुगाराचे साहित्य असे एकुण ६,९८०/-रु. किमतीचा मुददेमाल जप्त करुन ०८ आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी व मुददेमाल पुढील कारवाई करीता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भरत जाधव, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेट पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version