ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले वाईन्स शाॅप बंद

धुळे, निर्भीड वर्तमान:- धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी मोठे आंदोलन सुरू होते या आंदोलनाला अखेर यश आले आहे. काल झालेल्या मंत्रालयातील राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई यांच्या बैठकीत वाईन शॉप स्थलांतरीत करावे किंवा बंद करावे, अशी लोकभावना, पुतळ्याचे पावित्र्य राखणे, शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित ठेवणे यासर्व गोष्टींचा विचार करून कायद्यातील तरतुदीनुसार हे वॉइन शॉप स्थलांतरीत करण्याची तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत व लोकभावना लक्षात घेता या दुकानाला पुढील 10 दिवस बंद करण्याचे आदेशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

वाईन्स शाॅप बंद
वाईन्स शाॅप बंद

आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसांपासून आनंद लोंढे, भैय्यासाहेब वाघ आणि कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू केले होते. आ.फारुख शाह यांनी उपोषणकर्ते आनंद लोंढे, भैय्यासाहेब वाघ आणि कार्यकर्त्यांची भेट घेवून मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई यांच्या सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते दिलेल्या आश्वासनानुसार श्री. देसाई यांच्या दालनात धुळे शहरातील वाईन शॉपबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला धुळे शहरचे आमदार शाह फारूख अन्वर, सातारा जिल्हाधिकारी  जितेंद्र ड्रुडी, उपायुक्त सुभाष बोडके, उपसचिव रवींद्र औटी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, वाईन शॉप बंद करण्याबाबत आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे सहभागी झाले होते.

वाईन्स शाॅप बंद
वाईन्स शाॅप बंद

या बैठकीत संबंधित दुकान मालकाने स्वत: दुकानाचे स्थलांतर केल्यास सक्तीच्या स्थलांतरणाचा लाभ देण्याच्या सूचना देत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या आहेत तर पुढे मंत्री श्री. देसाई म्हणाले आहेत की, धुळे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी समन्वयाने दुकान मालकाकडून दुकानाचे नियमानुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी. दुकान मालक स्थलांतरास मान्य असल्यास सक्तीचे स्थलांतरणचा लाभ देण्यात यावा. धुळे शहरातील जनतेच्या भावना महत्वाच्या असून या दुकानाबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करावी.

वाईन्स शाॅप बंद
वाईन्स शाॅप बंद

बैठकीनंतर उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी उपोषण करणाऱ्या आंदोलकांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा करीत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!