क्राइमताज्या घडामोडीपुणे

Illegal Drinking : चायनीज सेंटर, व्हेज नॉनव्हेज हाॅटेलमध्ये सर्रास मद्यसेवन, विक्री सुरू

पुणे, निर्भीड वर्तमान :- पुणे शहरातील कात्रज भागातील बहुतांश वाईन्स शाॅप शेजारील चायनीज व्हेज – नॉनव्हेज हाॅटेलच्या नावाखाली सर्रासपणे मद्य / दारू पिण्यास मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

यामध्ये महत्त्वाचे असलेले कात्रज चौकाजवळील आर.के. वाईन्स दुकाना खालील हाॅटेल साईराज एखाद्या बियर बार रेस्टॉरंटला लाजवेल येवढी गर्दी या हाॅटेल मध्ये असते या हाॅटेल मालकाने गाळ्यामध्ये जागा शिल्लक नसल्याने हाॅटेल शेजारी अवैध्यरित्ता शेड टाकलेले आहे या शेडमध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहकांची विशेष सोय केली जाते खास आपल्या ग्राहकांच्या सोईसाठी मोकळ्या जागेत मुतारीही बांधण्यात आलेली आहे जणु काही विनापरवाना बियरबारच चालविण्यात येत आहे.

हाॅटेल साईराज शेजारील हाॅटेल जय भवानी तर अन्य हाॅटेलमध्येही हेच चित्र बघायला मिळते, दत्तनगर चौकाजवळील आहेर वाईन्स शाॅप शेजारी हाॅटेल राॅयल, हाॅटेल रिलॅक्स मध्ये दारू बिनधास्तपणे पिण्यास मिळते. शनीनगर चौकाजवळील आर. के बियर शाॅप शेजारील चायनीज हाॅटेल मध्ये बियर सोबत दारू पिण्यास मिळते. दत्तनगर रोड वरील व्हिनस वाईन्स शेजारील हाॅटेल मध्ये मद्य बिनदिक्कत पिण्यास मिळते आहे. कात्रज घाटाकडील हाॅटेल मध्ये दारू पिण्याच्या मैफिली सुरू असतात.

पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या आशिर्वादामुळेच अवैध्य हाॅटेल मालक आपल्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची लाखो रुपयांचा कर चुकवून फसवणूक करत आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते व अवैध्य हाॅटेल चालकांची पाठराखण केली जात आहे. नाममात्र कारवाई करून दुसर्‍याच दिवशी पुन्हा जोमाने हाॅटेल सुरू केली जातात याच विनापरवाना हाॅटेल मुळे रस्त्यावर सुध्दा वाहणे लावून त्या ठिकाणी मद्यसेवन केले जाते त्यामधून वाहतूक कोंडी तर अनेक वेळा टोकाचे वाद निर्माण होतात अशी माहिती रिपब्लिकन संघर्ष सेना अध्यक्ष शशीकांत कांबळे यांनी दिली आहे. तात्काळ संबंधित सर्व अवैध्य हाॅटेल मधील मद्यसेवन पोलीस प्रशासन व राज्यातील उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्त ठोस कार्यवाहीची मागणी रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली असून जर हे कायद्याची पायमल्ली करणारे उद्योग बंद न झाल्यास आंदोलनाचा ईशारा सेनेचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!