गुन्हयात अटक पूर्व जामीनास सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षकाने मागितली लाच..!!

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडुन कारवाई,लाचखोर पोलीस निरीक्षकास झाली अटक.

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तक्रारदार यांचा भाऊ श्री. गोविंद मुंडे यांचे विरुध्द दाखल गुन्हयात अटक पूर्व जामीनास सहकार्य केल्याचा मोबदला म्हणुन व तपासामध्ये मदत करण्यासाठी लोकसेवक पीएसआय श्री. शेळके हे २५०००/- रुपये लाचेची मागणी करत होते.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०५/१२/२०२२ रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक श्री. शेळके यांनी तक्रारदार यांचे कडे पंचा समक्ष २५०००/- रुपये लाच मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.

त्यावरुन दिनांक ०८/१२/२०२२ रोजी पंचासमक्ष सापळा लावला असता आलोसे श्री. शेळके यांनी २५०००/रुपये लाचेची मागणी करुन पंचासमक्ष तडजोडीअंती १००००/- रुपये पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

श्री. प्रकाश दशरथ शेळके, उप निरीक्षक, पोलीस स्टेशन, सिरसाळा यांनी तक्रारदार यांचा भाऊ श्री. गोविंद मुंडे यांचे विरुध्द दाखल गुन्हयात अटक पुर्व जामीनास सहकार्य केल्याचा मोबदला म्हणुन व तपासामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष लाच रक्कम मागणी करून ती स्विकारल्याने त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे सिरसाळा येथे गु.र.नं. २२४ / २०२२ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. दिनांक ०९/१२/२०२२ रोजी आलोसे श्री. प्रकाश शेळके यांना ००.३७ वा.अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास श्री. रविंद्र परदेशी पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. बीड करीत आहोत.

सदरची कारवाई मा.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री. विशाल सांबे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, श्री. शंकर शिंद पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र परदेशी पोलीस निरीक्षक, व पोलीस अंमलदार ला.प्र. वि. बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

 

 

Exit mobile version