ताज्या घडामोडी

गाईना इंन्जेक्शन देवुन त्यांना बेशुदध करुन त्यांची कत्तल करुन घेवुन जाणाऱ्या टोळीला दिघी पोलीसांनी केले जेरबंद..!!

तपास पथकाकडुन ०६ आरोपी अटक एकुण १३ गुन्हे केले उघड..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिघी पोलीस ठाणे येथे प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम, भारतीय हत्यार कायदा कलम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात गाईंना इन्जेक्शन देवून त्यांना बेशुदध करुन त्यांची वाहतुन करुन त्यांची कत्तल करण्यासंदर्भात गुन्हे घडलेले होते.

या गुन्हयांचा तपास करणे बाबत मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केले होते. तपास चालू असताना दि. २८/१२/२०२२ रोजी पोउनि भदाणे, पोहा कांबळे, पोना. नवधिरे, पोना.दौंडकर, पोशि.शिंदे असे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना दिघी आळंदी रोडवर एक संशईत बिना नंबरीची एन्जॉय कार फिरताना दिसली गाडीचा पाठलाग करत असतांना गाडीतील चार इसम त्यांच्या ताब्यातील गाडी पंचशिल बुद्ध विहारच्या मागे शिवनगरी कॉलणी कच्चा रस्तावर दिघी येथे सोडुन बाजुच्या टाटा कम्युनिकेशनच्या जंगलात पळुन गेले होते. हि गाडी गाईची वाहतुक करत असल्याचा संशय आल्याने जप्त करण्यात आली होती. गाडीच्या इंजीन नंबर वरुन मालकाची आरटीओ कडुन माहिती करुन दि. १६/०२ / २०२२ रोजी गाडी क्र. एमएच ०१ बीके १६६१ याचा मालक अशोक कोंडीबा जगताप. रा. बदलापुर यांची गाडीची चौकशी केली असता त्याने ती गाडी ०६ वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्याचे माहिती मिळाली. तसेच गाडी मोशिन बाबु कुरेशी रा. मिरारोड याचेकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दि १२/०१/२०२३ रोजी मोशिन कुरेशी याचा मिरारोड, काशिमीरा, नयानगर येथे शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. मोशिन कुरेशी यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन पोउनि. भदाणे यांनी आरोपीच्या मोबईल नंबरचे तसेच त्याचे साथिदारांचे मोबाईल नंबरचे सिडीआर व घटनास्थळावरील डम्प डाटा तसेच घटनास्थळाचे आजुबाजुच्या परीसरातील डम्प डाटाचे तांत्रिक विश्लेशन करून आरोपी यांचे तसेच त्यांचे साथिदारांचे नावे निष्पन्न केली.

दि. २८/०१/२०२२ रोजी तपास पथकाने आरोपी यांचा मोबाईल क्रमांक यावरुन आरोपी याचा कुसेगाव काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत असताना लोकेशनच्या जवळ एक इन्होवा गाडी संशईत रित्या उभी असलेली दिसली. पोलीस आरोपीचा परीसरात शोध घेत असताना संशईत इन्होवा एक अनोळखी इसम भरधाव वेगाने घेवुन जाताना दिसला त्याचा पाठलाग करुन हशीम मोहम्मद कुरेशी, वय २१ वर्षे यास इन्होवा गाडी क्र. एमएच ०६ एएल ०६९९ हिच्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर हशीम कुरेशी यांचेसोबत जावुन आरोपी आरीफ कुरेशी व अशरफ कुरेशी, मोहम्मद आरीफ सुलेमान कुरेशी वय ५१ वर्षे, शाईद सुलेमान कुरेशी वय ४२ वर्षे, व मोसिन बाबु कुरेशी, वय २८ वर्षे, यांना ताब्यात घेतले. एकुण ०५ आरोपी यांना दि. २९/०१/२३ रोजी अटक केली असता त्यांना दि. ०३/०२ / २३३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. अटक आरोपी यांचे मदतीने दि. ०१/०२/२३ रोजी मुंबई येथे जावुन पाहिजे आरोपी साहेल मो. फारुक कुरेशी, वय ३३ वर्षे, धंदा मांसविक्री, यांचा माहिम येथे शोध घेतला असता तो एक्सयुव्ही ५०० कार क्रं. एम क्रं. ०४ एफझेड ८४७८ या वाहनासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले तसेच गाडीत गाईंची कत्तल करण्यासाठी वापरेलेले साहित्य ३ कोयते व २ सत्तुर व इन्जेक्शन मिळुन आले. आरोपी अटक करण्यात आली असुन त्यास दि. ०७/०२/२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक आरोपीकडून ५,००,०००/- रू. कि. ची सेरोलेट कंपनीची इन्जॉय सिल्व्हर रंगाची कार नं. एम.एच- ०१ बी के १६६१२) १०,००,०००/- रू. कि. ची टोयोटा कंपनीची इनिव्हा सिल्व्हर रंगाची त्याचा नं. एम.एच०६ ए. एल- ०६९९३) १०,००,०००/- रू. कि. ची एक्सयुव्ही ५०० कार नं. एम.एच ०४ एफ. झेड- ८४७८ ४) दोन लोखंडी सत्तुर ५) तीन लोखंडी कोयते ६) नायलॉनच्या दोन लांब रस्सी ७) लोखंडी कानस ८) निळया रंगाच्या पिशव्या ९) रिकाम इंजेक्शन १० ) औषधाची काचेची बाटली ११) नंबर प्लेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अटक आरोपी यांचेकडुन खालीलप्रमाणे एकूण १३ गुन्हे उघड करण्यात आले आहे.

१) दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गु. रजि नं. ४८४/२०२२ भा. द. वि कलम ४२९. ३७९ ४११३४ सह प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५. ५ (अ). ५(ब) ६.९.एकुण २५,२०,९८०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२) दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्र. ३७६ / २२ भादवी कलम ४२९. ३७९. ३) दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्र. ५१/२३ भादवी कलम ३७९, ४२९ ३४ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ ५ (अ). ६ व ९.

४) पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरनं. ८५५/२२ भादवी कलम ३७९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५(अ) (१) (क). ९, ९ (अ).

५) पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्रं. १०१२ / २२ भादवी कलम ३७९,४२९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ (क), ९ (अ).

६) पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्र. ७९०/२२ भादवी कलम ३७९.

७) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्रं. ७५२/२२ भादवी कलम ३७९.३४ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ ५ (अ), ९.

८) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्रं. ४१६ / २१ भादवी कलम ४२९ ३४ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५. ५ ( अ ) .६, ९.

९) देहुरोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्र. ५१९ / २२ भादवी कलम ४२९. ३४

१०) वाकड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्रं. ११०७/२२ भादवी कलम ३७९, ४२९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ (क). ९ (अ).

(११) खेड पोलीस ठाणे पुणे ग्रामिण गुरक्रं. ७७/२२ भादवी कलम ३७९. १२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर आयुक्तालय गुरक्रं. १५/२३ भादवी कलम ३७९.

(१३) हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर आयुक्तालय गुरक्रं. १६०१ / २२ भादवी कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ (क). ९(अ), (ब).

सदरच्या कारवाईत एकूण २५,२०,९८०/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयातील ०९ आरोपींची नावे निष्पन्न करून काशिमीरा, मिरारोड, नयानगर, माहिम मुंबई येथुन एकुण ०६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढिल तपास पोउपनि भदाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त सो, श्री. मनोजकुमार लोहीया, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो, डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त सो, परीमंडळ ०१, श्री. विवेक पाटील मा. सहायक पोलीस आयुक्त सो, चाकण विभाग, श्रीमती प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे श्री. दिलीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सुनिल भदाणे, पोलीस उप निरीक्षक, पोहा. चिंतामण फलके, पोहा. प्रदीप पोटे, पोहा.किशोर कांबळे, पोहा.सतीष जाधव, पोना.बाळासाहेब विधाते, पोना. किरण जाधव, पोना.नवधिरे, पोना .दौंडकर, पोशि. रामदास दहीफळे. पोशि.बाबाजी जाधव व पोशि. शिंदे यांनी तसेच मपोना.भागश्री जमदाडे पोलीस उपायुक्त कार्यालय परी.०१ यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!