ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

कर्वेनगरमधील १२ मीटर डीपी रस्त्याचे खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

श्री. स्वप्नील दुधाने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश, काम लवकरच पूर्णत्वास

पुणे दि. 9 निर्भीड वर्तमान:- कर्वेनगर प्रभागतील चिंतामणी रेसिडेन्सी, बराटे एम्पायर, आशा रेसिडेन्सी, पिनाक रेसिडेन्सी आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल येथिल १२ मीटर डीपी रस्त्याचा भूमिपूजन सोहळा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे भूमिपूजन
खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे भूमिपूजन

हा डीपी रस्त्याचे काम मान्य डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये समाविष्ट असूनही अनेक दिवस प्रलंबित असल्याने नागरिकांची मात्र खुपच गैरसोय होत होती. यावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने श्री.स्वप्नील दुधाने यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांच्यामार्फत मा.आयुक्त साहेब, मनपा पथ विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. या पाठपुराव्यास यश आले असून रस्त्यास तरतूद उपलब्ध झाल्यानंतर पाठपुरावा करत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे भूमिपूजन
खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे भूमिपूजन

रस्ता आला म्हणजेच कोणीतरी कोठेतरी बाधित होतो अश्या बाधित मूळ मालकांशी सल्ला मसलत चर्चा करत प्राथमिक ताबे यादी मनपाला हस्तांतरित करण्यात आली आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदारास देण्यात आली. या पाठपुराव्याची फलश्रुती म्हणून या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून त्वरित प्रत्यक्ष कामास सुरवात होत आहे. यावेळी आजूबाजूच्या रहिवासी नागरिकांनी उपस्थिती दर्शवत समाधान व्यक्त केले.

या नागरिकांच्या डोळ्यातील समाधान नक्कीच आनंददायी आणि उर्जादायी असून काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रसारमाध्यमांना सांगतांना श्री. स्वप्नील दुधाने म्हणाले आहेत. यावेळी कर्वेनगर- कोथरूड विधानसभा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक सन्माननीय पदाधिकारी तसेच प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!