खाण कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या मुला/मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य रकमेत वाढ

अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 (प्री-मॅट्रिकसाठी) आणि 31 डिसेंबर 2023  (पोस्ट-मॅट्रिकसाठी)

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत, महाराष्ट्र आणि गोवा राज्य आणि दादरा, नगर हवेली आणि दमण या केंद्रशासित प्रदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे बीडी/ चुनखडी आणि डोलोमाईट/लोह/मॅंगनीज/क्रोम खनिज क्षेत्रात काम करणाऱ्या खाण कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या मुला/मुलींसाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नियमांनुसार इयत्ता 1 पासून उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती/गणवेशाची रक्कम वाढवण्यात आली आहे, अशी माहिती कामगार कल्याण कल्याण विभाग नागपूर कार्यालयाचे  कल्याण आयुक्त, डब्ल्यू.टी. थॉमस यांनी दिली आहे.

इयत्ता 1 ते 4 साठी 1,000 रुपये, इयत्ता 5 ते 8 साठी 1,500 रुपये, इयत्ता 9 वी ते 10 साठी 2,000 रुपये, इयत्ता 11 ते 12 साठी रुपये 3,000 आणि औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था, तंत्रनिकेतन आणि बीएससी कृषी सह पदवी अभ्यासक्रमांसाठी वार्षिक अर्थसहाय्य 6,000 रुपये आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यांसारख्या व्यावसायिक अ‍भ्यासक्रमांसाठी 25,000 रुपये वार्षिक अर्थसहाय्य वाढवण्यात आले आहे.

योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in वर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 (प्री-मॅट्रिकसाठी) आणि 31 डिसेंबर 2023  (पोस्ट-मॅट्रिकसाठी) अशी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती/अटी आणि पात्रता राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाइन प्रदर्शित केली आहे. ऑनलाइन अर्जासोबत जोडली जाणारी कागदपत्रे वाचनीय असली पाहिजेत. अर्ज केल्यानंतर, अर्जदार  शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधून अर्जाची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इतर कोणत्याही समस्या/निराकरणासाठी, नागपूर मुख्यालय दूरध्वनी क्रमांक 0712-2510200 आणि 071-2510474 वर किंवा wcngp-labour@nic.in या ईमेलवर संपर्क साधता येईल. तसेच, कामगार कल्याण संस्थेद्वारे चालवल्या जाणार्‍या जवळच्या दवाखान्याचे/रुग्णालयांचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी/डॉक्टर यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवता येते. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज आणि संस्थेने सत्यापित न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Exit mobile version