ताज्या घडामोडीपुणे

कोयता उगारुन महिलेला जिवे मारण्याची धमकी देणा-यांना शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- जंगली महाराज रोडवरील जे.एम. कॉर्नर या खाऊ गल्लीमध्ये खाद्य पदार्थ विक्री करणा-या महीलेवर तिथे आलेल्या टोळक्याने तत्कालीन झालेल्या वादावरून त्या महीलेवर कोयता उगारून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन त्या परिसरात दहशत निर्माण करून ते टोळके पसार झाले होते. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०२/२०२३ भा.द.वि. कलम. ५०६ (२), ५०४, १४३, १४७, १४९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) आणि क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३७ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून टोळक्यातील मुलांची ओळख पटविण्यात आली. व त्यानंतर त्यांचे ठावठिकाण्याबाबत गोपनीय रित्या माहीती प्राप्त करून सातत्यपुर्ण तपास करून १) रणजित रघुनाथ रामगुडे, वय २० वर्ष, २) रोहन गोरख सरक, वय १९ वर्ष, ३) विशाल शंकर सिंह वय १८ वर्ष, व दोन विधीसंघर्षितीत बालके यांना शिताफिने वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले. त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे.

आरोपी कडुन गुन्हयात वापरलेले चार लोखंडी कोयते आणि गुन्हयात वापरलेल्या चार दुचाकी गाडया असा एकुण १,२५,०००/- किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, श्री. सन्दीप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री सतीश गोवेकर, तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, दिलीप नांगरे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!