कोंढवा परिसरात अवैध्य धंद्याचा सुळसुळाट..!!

पोलिस प्रशासन कारवाई करणार तरी कधी नागरिकांचा सवाल..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- कोंढवा परिसरात सर्वत्र जुगार- मटका, गावठी दारूविक्री असे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. मात्र, पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये येत नसल्याचे चित्र आहे.

अवैध धंद्यांवर कारवाई ऐवजी पोलिस प्रशासन ’हप्ता वसुलीत’ मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी कडून केला जात आहे. पोलिसांना अनेक वेळा सजग नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनाही अवैध धंदे सुरू असल्याचे सापडले आहेत, परंतू त्यांच्या विरोधात कायम स्वरूपी ठोस कारवाई होत नाही.अशा ठिकाणी कर्मचार्‍यांपासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते वसूल होतात का? असाही प्रश्न विचारला जात आहे.

सर्व सामान्य नागरिकांकडून तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सोनवणे यांनी सह्हाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग यांना भेटून निवेदन दिले आहे. निवेदना मध्ये सोनवणे यांनी कोंढवा परिसरातील सर्व अवैध्य धंदेबाबत माहिती व सह्हाय्यक पोलिस आयुक्त यांना दिले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने

पत्त्याचा कल्ब, फॉरेस्ट भिंती जवळ कोंढवा बुद्रुक,

मटका जुगार- पाण्याच्या टाकीखाली, कै. दशरथ मरळ चौक कोढंवा बुद्रुक,

मटका जुगार- केअर हाॅस्पिटल रोड बिस्मिल्ला मटण शाॅप, वेलकम हाॅल जवळ कोंढवा,

लाॅटरी सेंटर- अॅक्सिस बॅक शेजारी व समोर आशिर्वाद बिल्डींग, भैरवनाथ मंदिर कोंढवा,

लाॅटरी सेंटर- मारुती सुझुकी शोरूम समोर, बारामती सहकार बॅक लिमिटेड शेजारी कोंढवा  अश्या ठिकाणी सदरचे अवैध्य जुगार,मटका पत्याचे कल्ब असे धंदे राजरोसपणे सुरू असलेबाबत तक्रार मंगेश सोनावणे यांनी दिली आहे.

सदरचे धंदे तात्काळ बंद करावेत व अवैध धंदे करणार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सोनावणे यांनी केली असुन अवैध्य धंदे बंद न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असेही सह्हाय्यक पोलिस आयुक्त साहेब यांना सांगण्यात आहे. अवैध धंद्यावर पोलिस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Exit mobile version